आयटी कर्मचाऱ्यांची भीती,  'पुढील सहा महिन्यात संकट होणार गहिरे'

IT-Company
IT-Company

अस्थिर अर्थव्यवस्था, नोकऱ्यांची कमतरता आणि वेतन कपात यामुळे भारतातील माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये मोठे असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. जे आयटी, मिडिया आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांना आपल्या नोकरीची चिंता वाटते आहे. पुढील सहा महिन्यात परिस्थिती आणखी गंभीर होत जाईल अशी भीती या कर्मचाऱ्यांना वाटते आहे, असे लिंक्डइन केलेल्या एका पाहणी अहवालातून समोर आले आहे. लिंक्डइन हे मायक्रोसॉफ्टच्या मालकीचे कर्मचाऱ्यांशी निगडित सर्वात मोठे नेटवर्क आहे.

मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील चारपैकी एका  कर्मचाऱ्याला आणि आयटी क्षेत्रातील पाचपैकी एका कर्मचाऱ्याला पुढील सहा महिन्यात परिस्थिती आणखी गंभीर होईल, नजीकच्या काळात अडचणी वाढत जातील असे वाटते आहे. पाचपैकी दोन मिडिया कर्मचाऱ्यांचेदेखील अशाच प्रकारचे मत आहे.

आगामी काळात नोकऱ्यांबद्दल साशंकता
लिंक्डइनच्या पाहणी अहवालानुसार तीनपैकी एका भारतीयाने त्याच्या वैयक्तिक उत्पन्नात घट झाल्याचे सांगितले आहे. तर ४८ टक्के नोकरीच्या शोधातील उमेदवार आणि ४३ टक्के पूर्णवेळ कर्मचारी यांना पुढील दोन आठवड्यात फारच थोड्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता वाटते. तर लिंक्डइनच्या दुसऱ्या 'वर्कफोर्स कॉन्फिडन्स इंडेक्स' नुसार कर्मचाऱ्यांना भविष्यात संधी मिळण्यासंदर्भात खात्रीत मोठी घट झाली आहे. पुढील काळ खडतर असणार आहे असेच बहुतांश कर्मचाऱ्यांना वाटते आहे.

बहुतांश क्षेत्रांमधून नवीन मनुष्यबळ भरती थांबली आहे, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांच्या अपेक्षांमध्ये बदल झाला आहे कारण नजीकच्या काळात नोकरीच्या नवीन संधी निर्माण होण्याची शक्यता कमी झाली आहे, असे मत लिंक्डइनने व्यक्त केले आहे. 

नोकरीच्या शोधात असणाऱ्या जवळपास ४८ टक्के लोकांना असे वाटते आहे की आगामी काळात नोकऱ्यांच्या संधीत मोठी घट होईल. कंपन्यांकडून मिळणाऱ्या प्रतिसादात पुढील दोन आठवड्यात घट होण्याची शक्यता नोकरीच्या शोधात असणाऱ्या ३६ टक्के लोकांना वाटते आहे. ऑनलाईन शिक्षणाच्या मागणीत मात्र होताना दिसते आहे. कारण ६७ टक्के कर्मचारी ऑनलाईन शिक्षणात आपला वेळ गुंतवत आहेत. तर देशातील ३७ टक्के कंपन्या आपल्या भारतातील कर्मचाऱ्यांना ऑनलाईन सुविधा पुरवत आहेत.

आरोग्य क्षेत्र, शिक्षण क्षेत्र आणि कॉर्पोरेट सेवा क्षेत्रातील कर्मचारी निर्धास्त
लिंक्डइनच्या पाहणी अहवालानुसार आरोग्य क्षेत्र, शिक्षण क्षेत्र आणि कॉर्पोरेट सेवा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपनीच्या भवितव्याबद्दल खात्री वाटते आहे. अहवालानुसार कॉर्पोरेट सेवा क्षेत्रातील ५२ टक्के कर्मचारी, आरोग्य क्षेत्रातील ५० टक्के कर्मचारी आणि शिक्षण क्षेत्रातील ३३ टक्के कर्मचाऱ्यांना पुढील सहा महिन्यांतील त्यांच्या कंपन्यांच्या चांगल्या स्थितीबद्दल खात्री वाटते आहे. अर्थात स्वत:चा व्यवसाय करणारे लॉकडाऊनच्या कालावधीत सर्वाधिक अडचणीत आले असून जवळपास ६२ टक्क्यांना मोठा फटका बसल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या उत्पन्नात घट झाली आहे. लिंक्डइन वर्कफोर्स कॉन्फिडन्स इंडेक्स हा १ एप्रिल ते एप्रिल आणि १३ एप्रिल ते १९ एप्रिल या कालावधीत २,२५४ सदस्यांच्या ऑनलाईन पाहणीवर आधारित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com