देशातील बेरोजगारी दर एप्रिलमध्ये २३.५ टक्क्यांवर; महाराष्ट्रात किती पाहा!

Employment
Employment

नवी दिल्ली Coronavirus - कोविड-१९ महामारीमुळे देशभर मार्च महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे बेरोजगारीचा दर वाढला आहे. एप्रिल महिन्यात देातील बेरोजगारीदर वाढून २३.५ टक्क्यांवर पोचला आहे. १४.८ टक्के असलेला बेरोजगारीदर लॉकडाऊनच्या काळात २३.५ टक्क्यांवर पोचला आहे. मार्च महिन्यात बेरोजगारी दर ८.७ टक्क्यांवर होता. एप्रिल महिन्यात त्यात मोठी वाढ झाली आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने (सीएमआयई) जाहीर केलेल्या अहवालातील आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.

'देशभर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे फक्त ७.२ कोटी कामगारांचा रोजगार गेला नाही तर आणखी ८.५ कोटी रोजगाराच्या शोधात असलेल्यांची त्यात भर पडली आहे.  मात्र त्यांच्यासाठी कोणताही रोजगार उपलब्ध नाही. यातून रोजगार गमावण्याची मोठी भीती असलेल्यांची संख्या समोर येते आहे. कामगार किंवा कर्मचाऱ्यांना आपला रोजगार गमावला जाण्याची मोठीच भीती देशभरातील लॉकडाऊनमुळे निर्माण झाली आहे', असे मत सीएमआयईचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी महेश व्यास यांनी या अहवालात व्यक्त केली आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सीएमआयईने २०१६ पासून आपल्या पाहणी अहवालाला सुरूवात केली होती. त्यानंतर सीएमआयई बेरोजगारीदराची आकडेवारी जाहीर करत असते. मात्र २०१६ नंतर एप्रिलमध्ये नोंदवण्यात आलेला २३.५ टक्के बेरोजगारी दर हा आतापर्यतचा सर्वाधिक आहे. एप्रिल महिन्यात शहरी भागातील बेरोजगारीदर २४.९५ टक्के इतका आहे. तर ग्रामीण भागातील बेरोजगारीदर २२.८९ टक्क्यांवर पोचला आहे. लॉकडाऊनचा फटका ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागातील रोजगाराला अधिक बसल्याचे सीएमआयईच्या आकडेवारीतून दिसते आहे. अर्थात प्रत्येक राज्यागणिक बेरोजगारीदर वेगवेगळा आहे. देशात पुदुचेरीमध्ये सर्वाधिक म्हणजे ७५.८ टक्के इतका बेरोजगारीदर आहे. त्याखालोखाल तामिळनाडूत 49.8 टक्के, झारखंडमध्ये 47.1 टक्के, बिहारमध्ये 46.6 टक्के आणि हरियाणामध्ये ४३.२ टक्के इतका आहे.

त्रिपूरामध्ये ४१.२ टक्के, कर्नाटकात २९.८ टक्के, ओदिशात २३.८ टक्के, उत्तर प्रदेशात २१.५ टक्के, महाराष्ट्रात २०.९ टक्के, आंध्र प्रदेशात २०.५ टक्के, गुजरातमध्ये १८.७ टक्के, राजस्थानमध्ये १७.७ टक्के, पश्चिम बंगालमध्ये १७.४ टक्के, केरळमध्ये १७ टक्के, दिल्लीत १६.७ टक्के, गोव्यात १३.३ टक्के, मध्य प्रदेशात १२.४ टक्के, आसाममध्ये ११.१ टक्के, मेघालयात १० टक्के, उत्तराखंडमध्ये ६.५ टक्के, तेलंगणामध्ये ६.२ टक्के, छत्तीसगडमध्ये ३.४ टक्के, पंजाबमध्ये २.९ टक्के, सिक्किममध्ये २.३ टक्के आणि हिमाचल प्रदेशात २.२ टक्के इतका बेरोजगारीदर सीएमआयईच्या अहवालातून समोर आली आहे.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बेरोजगारीदर २३.८ टक्के इतका होता. दुसऱ्या आठवड्यात तो २३.४ टक्क्यांवर आला, मात्र एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात बेरोजगारीदर वाढून २४ टक्क्यांपर्यत वाढला आहे. कोविड-१९चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

लॉकडाऊनचा विपरित परिणाम होत अर्थव्यवस्थेसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. बहुतांश उद्योग-व्यवसाय ठप्प झाले आहेत. बहुतांश क्षेत्रांना लॉकडाऊनचा मोठा तडाखा बसला आहे. 

सीएमआयईच्या पाहणी अहवालासाठी प्रत्येक महिन्यात ४३,६०० घरांमधील माहितीचा आधार बेरोजगारीदराचे विश्लेषण करण्यासाठी घेतले जातो.

सीएमआयईच्या अहवालातील आकडेवारी
एप्रिलमध्ये बेरोजगारीदर २३.५ टक्क्यांच्या उच्चांकीवर
मार्चमध्ये बेरोजगारीदर ८.७ टक्के
महाराष्ट्रातील बेरोजगारीदर २०.९ टक्के
लॉकडाऊनमुळे रोजगारात मोठी घट
ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागातील बेरोजगारीदर अधिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com