‘कॉसमॉस’ची आयटी सेवा फोल

‘कॉसमॉस’ची आयटी सेवा फोल

मुंबई - कॉसमॉस बॅंकेवर मालवेयर हल्ला झाला असल्याचा दावा करून नॅशनल पेमेंट कौंसिल ऑफ इंडियाने (एनपीसीआय) बॅंकेच्या आयटी सुरक्षेबाबत प्रश्‍न उपस्थित केला आहे. ‘एनपीसीआय’ची आयटी यंत्रणा पूर्णपणे सुरक्षित आहे. ऑनलाईन दरोडा बॅंकेच्या सदोष यंत्रणेमुळे झाला असल्याचे एनपीसीआयने म्हटले आहे. मालवेयर हल्ला नसल्याचे कॉसमॉस बॅंकेने म्हटले होते.

कॉसमॉस बॅंकेचा सर्व्हर हॅक करून हॅकर्सनी बॅंकेतील ९४ कोटी ४२ लाखांची रक्कम २९ देशांमधील एटीएममधून काढून घेतली. कॉसमॉस बॅंकेवरील ऑनलाईन दरोड्याने बॅंकिंग क्षेत्रातील माहिती आणि तंत्रज्ञान यंत्रणेसंदर्भात प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. कॉसमॉस बॅंकेच्या आयटी सेवेवर मालवेयर हल्ला झाल्यामुळे हा ऑनलाईन दरोडा पडल्याचे ‘एनपीसीआय’चे जोखीम व्यवस्थापन विभागाचे प्रमुख भरत पांचाळ यांनी सांगितले. ‘एनपीसीआय’ नेटवर्कमधील एका सदस्याने बॅंकेच्या आयटी सेवेवर मालवेयर हल्ला झाल्याची खात्री केल्याचे त्यांनी सांगितले. ११ आणि १३ ऑगस्टला हॅकर्सनी कॉसमॉस बॅंकेवर डल्ला मारला. बहुतांश व्यवहार परदेशांमधून करण्यात आल्याचे पांचाळ यांनी सांगितले. ते म्हणाले की, एनपीसीआयची आयटी सेवा पूर्णपणे सुरक्षित आहे. हा हल्ला कसा झाला आहे. याप्रकरणी तपासात ‘एनपीसीआय’कडून बॅंकेला पूर्णपणे सहकार्य केले जाईल, असे त्यांनी सांगितले. कॉसमॉस प्रकरणानंतर ‘एनपीसीआय’ सतर्क झाली आहे. ऑनलाईन व्यवहारांवर देखरेख केली जात आहे. भारतातील किरकोळ ऑनलाईन पेमेंट आणि सेटलमेंटचे व्यवस्थापन एनपीसीआयकडून केले जाते.

सुरक्षेवर जेमतेम खर्च 
बॅंकिंग क्षेत्रातील तीव्र स्पर्धेने बॅंकांच्या उत्पन्नावर परिणाम केला आहे. त्यामुळे सहकारी बॅंकांमध्ये आयटी सुरक्षेवर जेमतेम खर्च केला जात आहे. या बॅंका हॅकर्सचे सॉफ्ट टार्गेट असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. जागतिक दर्जाच्या अद्ययावत माहिती आणि तंत्रज्ञान प्रणालीसाठी बॅंकांना मोठी तरतूद करावी लागते; अन्यथा हॅकर्सकडून सहजपणे सायबर हल्ले केले जातील, अशी भीती सायबर तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com