लॅपटॉप, TV, फ्रीज महागणार; जाणून घ्या का वाढताहेत किंमती?

कन्झ्युमर ड्युरेबल वस्तूंची जूलै महिन्यापासून होणार भाववाढ
Tv, Laptop, Fridge
Tv, Laptop, FridgeSakal Media

तुम्ही जर टीव्ही फ्रीज किंवा लॅपटॉप खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण पुढील महिन्यात म्हणजेच जुलैमध्ये कन्झ्युमर ड्युरेबल (Consumer Durables) वस्तूंच्या किंमतीत वाढ होणार आहे. वाढत्या कच्च्या मालाच्या किमतींमुळे आणि महत्त्वाच्या सामानाच्या कमतरतेमुळे येत्या महिन्यात कन्झ्युमर प्रोडक्ट्सच्या किमतीत वाढ केली जाणार आहे. वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन शाळांमुळे लॅपटॉपला मोठी मागणी आहे त्यामुळेच याच्या किंमतीतही वाढ सुरूच आहे. अनलॉकनंतर आता पुन्हा दुकानं उघडली जात आहेत, पण सध्या ग्राहकांसमोर डिस्काऊंटचा पर्याय उपलब्ध नसेल. (cost of consumer durables to increase from the month of july 2021 read what is reason)

१० टक्क्यांनी वाढू शकतात किंमती

जानेवारी २०२१ पासूनच खरंतर कंझ्युमर प्रॉडक्ट्स म्हणजेच TV, फ्रीज, लॅपटॉप यांसारख्या उत्पादनांच्या किंमती वाढत आहेत. त्यातच येत्या जुलै महिन्यात कंपन्या पुन्हा एकदा १० टक्के किंमती वाढवण्याच्या विचारात आहेत. यावेळी दरवाढ होण्यासाठी केवळ एक नव्हे तर विविध कारणं आहेत. यामध्ये मायक्रोप्रोसेसर आणि पॅनलमधील महत्त्वाच्या वस्तूंची कमतरता, कच्चा माल तसेच लोखंड आणि तांब्याच्या किंमतीमध्ये सातत्याने होणारी वाढ, पार्ट्सवरील आयात कमी करण्यासाठी वाढवण्यात आलेलं आयात शुल्क, या एक ना अनेक कारणांमुळे विविध उत्पादनांच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.

वर्क फ्रॉम होम आणि शाळा सुरु न होण्याचा परिणाम

एका नामांकित कंपनीचे व्यवस्थापकीय संस्थापक निलेश गुप्ता सांगतात, "येत्या काळात किंमती वाढताना पाहायला मिळतील. पॅनलच्या कमतरतेमुळे टीव्हीच्या किमतींमध्ये जास्त वाढ होताना पाहायला मिळेल. सोबतच सलग दुसऱ्यावर्षी शाळा न उघडल्याने ऑनलाइन शाळा तसेच वर्क फ्रॉम होम कल्चरमुळे लॅपटॉपच्या मागणीत देखील प्रचंड वाढ झालेली आहे. गेल्या काळात लॅपटॉपच्या किंमती तब्बल ५ ते ७ टक्क्यांनी वाढल्या होत्या. आता या किंमती आणखी वाढू शकतात.

मागणीमध्ये वाढ, मात्र...

रिटेलर्स असोसिएअशन ऑफ इंडियाचे CEO कुमार राजगोपालन म्हणतात, "लॉकडाऊननंतर कमी झालेल्या मागणीमध्ये निश्चित वाढ होत आहे. मात्र, अजूनही हवा तसा व्य़वसाय होत नाहीए. कंपन्यांकडे देखील पुरेसा स्टॉक उपलब्ध आहे. येत्या काळात रिटेलर्स देखील जास्त डिस्काउंट देण्यावर भर देणार नाहीत.

नियमांत मिळाली सवलत

किंमतींमधील ही वाढ यापेक्षा अधिक असती मात्र, यंदा सरकारने ऊर्जा कार्यक्षमतेच्या नियमांत सवलत दिल्यानं भाववाढ जास्त झालेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com