देशामधील अन्य क्षेत्रांतील काळा पैसा शोधावा - उटगी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

मुंबई - चलनी नोटांमधील काळा पैसा शोधून काढण्याबरोबरच आणखी सात क्षेत्रात काळा पैसा दडून आहे. तो शोधून काढण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्‍यक असल्याचे मत बॅंक कामगार नेते विश्‍वास उटगी यांनी व्यक्त केले. पुरेशा यंत्रणेअभावी घाईगडबडीने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मनस्ताप होईल, असे त्यांनी सांगितले. 

जमीन, स्थावर आणि जंगम मालमत्ता, बॉलिवूड-हॉलिवूड, मौल्यवान धातू, पंचतारांकित हॉटेल्समधील व्यवहार, ड्रग्ज, हवाला आणि रोख स्वरूपात काळा पैसा आहे. तो बाहेर काढण्यासाठी ठोस उपाययोजनांची आवश्‍यकता असल्याचे मत उटगी यांनी व्यक्त केले. अर्थव्यवस्थेतील १० ते १२ लाख कोटी हे चिटफंड कंपन्यांमध्ये अडकले असून, यातील बहुतांश काळा पैसा असल्याचे उटगी यांनी सांगितले. ते म्हणाले की, सरकारने दोन हजारांची नोट बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यामुळे ज्यांच्याकडे पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांचा मोठा साठा आहे ते दोन हजारची नोट बाजारात येईपर्यंत वाट पाहतील. दोन हजाराची नोट चलनात आली, की त्यांच्याकडून पाचशे आणि हजारांच्या नोटा बदलून घेतल्या जातील. त्यामुळे नेमका किती काळा पैसा यातून बाहेर पडेल, हे सांगणे कठिण असल्याचे मत उटगी यांनी व्यक्‍त केले.

Web Title: Country to find money in other areas