
कोविड 19च्या प्रभावापूर्वी डी मार्टची उलाढाल ही 323 कोटीच्या घरात होती. कोरोना विषाणूच्या प्रभावामुळे यात तब्बल 40 कोटींची घसरण झाली आहे.
नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडून या विषाणूचे वेगाने होणारे संक्रण रोखण्यासाठी देशात लॉकडाउनसारखा कठिण निर्णय सरकारने घेतला. लॉकडाउनमुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा आवाक्यात आणण्यात यश आल्याचा दावाही करण्यात येत आहे. पण या काळात उद्योग-व्यवसाय पूर्णत: कोलमडला आहे. रिटेल साखळीतील एक मोठं नाव असलेल्या डी'मार्टचा उद्योग अक्षरश: बसला आहे. डीमार्टने जारी केलेल्या तिमाहीच्या रिपोर्टनुसार, कंपनीला 88 टक्के तूट सहन करावी लागली. कोविड 19च्या प्रभावापूर्वी डी मार्टची उलाढाल ही 323 कोटीच्या घरात होती. कोरोना विषाणूच्या प्रभावामुळे यात तब्बल 40 कोटींची घसरण झाली आहे.
देशातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा वेगाने वाढत आहे. याचा मोठा आर्थिक फटका सुपर मार्केटला बसला आहे, असे सुपर मार्ट लिमिटेडचे कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक नेविल नोरोन्हा यांनी म्हटले आहे. मागील तिमाहीच्या तुलनेत कंपनीला मोठे नुकसान झाल्याचेही त्यांनी म्हटलंय. जून 2019 च्या अखेरीस कंपनीला 5 हजार 826 कोटी इतके उत्पन्न मिळाले होते. यंदाच्या तिमाहीत यात 32 टक्के घट झाली असून केवळ 3,933 कोटी उत्पन्न मिळाले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
व्यवसाय मॉडेलमध्ये आम्ही खर्च कार्यकुशलतेवर लक्ष केंद्रित केल्यामुळे व्यवसायाला तुलनेने कमी नुकसान सहन करावे लागले, असेही त्यांनी सांगितले. कोरोनाजन्य परिस्थितीत कडकडीत लॉकडाउन असताना मुंबईसह अन्य शहरात DMart Ready App च्या माध्यमातून ग्राहकांना सेवा देण्यात आली. यावेळी होम डिलिव्हरीच्या सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला. लॉकडाउनचे निर्बंध शिथील झाल्यानंतर डी मार्ट खुली करण्याची परवानगी मिळाल्यावर ही सेवा बंद करण्यात आली, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.