
1 जुलैपासून क्रेडिट आणि डेबिट कार्डशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे.
1 जुलैपासून टोकनद्वारे केलं जाणार पेमेंट, क्रेडिट-डेबिट कार्डचं टोकन कसं करायचं?
नवी दिल्ली : १ जुलै २०२२ पासून क्रेडिट (Credit card) आणि डेबिट कार्डशी (Debit card) संबंधित नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. १ जुलैपासून कार्ड पेमेंटसाठी टोकनायझेशन प्रणाली (Tokenization system) लागू होणार आहे. ऑनलाइन बँकिंग होत असलेली फसवणूक रोखणं हा टोकनायझेशन प्रणालीचा उद्देश आहे.
तुम्ही तुमचं कार्ड टोकन न केल्यास, ऑनलाइन स्टोअरवर सेव्ह केलेले डेबिट किंवा क्रेडिट कार्ड काढून टाकल्या जाईल. कार्ड टोकनायझेशन अनिवार्य नसले तरी ते एकाच वेबसाइट किंवा अॅपवरून वारंवार खरेदी करण्यासाठी किंवा पेमेंट करण्यासाठी अगदी सोपं असणार आहे.
कार्ड टोकनीकरण म्हणजे काय?
टोकनायझेशन (Card Tokenization) म्हणजे, कार्डच्या मूळ डिस्क्रिप्शनला टोकननं बदलणं. जे कार्ड कॉम्बिनेशसाठी युनिक असेल. टोकन रिक्वेस्टर ग्राहकांकडून कार्ड टोकनसाठी रिक्वेस्टर स्वीकारतं आणि कार्ड नेटवर्कला पाठवतं.
हेही वाचा: अग्निवीरांसाठी पेन्शन सोडण्यास तयार; भाजप खासदार वरुण गांधींची मोठी घोषणा
१ जुलैपासून काय होणार बदल?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (Reserve Bank of India, RBI) म्हटलंय की, ३० जून नंतर म्हणजेच १ जुलै २०२२ पासून व्यापाऱ्याला ग्राहकाची डेबिट आणि क्रेडिट कार्डवरची माहिती काढून टाकावी लागेल. याचा अर्थ असा की जर ग्राहकांनी कार्ड टोकनायझेशनसाठी संमती दिली नसेल, तर त्यांना प्रत्येक वेळी ऑनलाइन पेमेंट करताना कार्ड व्हेरिफिकेशन व्हॅल्यू (CVV) टाकण्याऐवजी नाव, कार्ड नंबर आणि कार्डची वैधता यासारखे कार्डचे सर्व डिटेल्स टाकावे लागतील. तर दुसरीकडं जर ग्राहकानं कार्ड टोकन देण्यास सहमती दिली, तर त्याला/तिला व्यवहार करताना फक्त CVV आणि OTP टाकावा लागेल.
हेही वाचा: Indian Railway : रेल्वेचा 'हा' अति स्वस्त शेअर देईल तगडा परतावा, तज्ज्ञांना विश्वास
क्रेडिट आणि डेबिट कार्ड टोकन कसं करावं?
शॉपिंग वेबसाइट/अॅपला भेट देऊन वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला पेमेंट करावं लागेल.
चेकआउट करताना तुम्हाला योग्य वाटेल ते कार्ड पेमेंट पर्याय निवडावा लागेल आणि नंतर CVV टाकावा लागेल.
यानंतर “Secure your card” किंवा “Save card as per RBI गाइडलाइन्स” वर क्लिक करावे लागेल. नंतर सेव्ह वर टॅप करून ओटीपी एंटर करावा लागेल.
यानंतरच मग तुमचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड टोकनाइज केलं जाईल.
Web Title: Credit And Debit Card Rules Will Change Dramatically From July 1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..