Cryptocurrency : क्रिप्टोकरन्सीच्या सीईओने गमावले 1,167 अब्ज; वाचा काय आहे कारण

एवढी मोठी रक्कम गमावल्यानंतर सॅम बँकमन दिवाळखोर झाले आहेत.
सॅम बँकमन-फ्राइड
सॅम बँकमन-फ्राइड sakal

24 तासांत 31 वर्षीय व्यक्तीने 14.6 अब्ज डॉलर्स म्हणजेच 1,167 अब्ज रुपये गमावले आहेत. ही व्यक्ती दुसरी कोणी नसून FTX चे CEO सॅम बँकमन-फ्राइड आहेत. एवढी मोठी रक्कम गमावल्यानंतर सॅम बँकमन दिवाळखोर झाले आहेत.

हेही वाचा : हिंदी चित्रपटांत का वाढते आहे हिंदुत्वाची कट्टरता?

अब्जाधीश सॅम बँकमन फ्राइड यांची एकूण संपत्ती जवळपास 94 टक्क्यांनी घसरली आहे. म्हणजे त्यांची संपत्ती 15.2 बिलियन डॉलर वरून 991.500 दशलक्ष डॉलर इतकी कमी झाली आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, एका दिवसात कोणत्याही अब्जाधीशांच्या संपत्तीत झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे. जेव्हा सॅम यांनी ट्विटरवर घोषणा केली की, त्याचे क्रिप्टो एक्सचेंज एफटीएफ प्रतिस्पर्धी बिनोस विकत घेणार आहे. फ्राइडच्या घोषणेनंतर, जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सी बिनॉसचे प्रमुख चांगपेंग झाओ यांनी या कराराची पुष्टी केली. यानंतर सॅम बँकमन फ्राइडची संपती कमी झाली आहे. 

सॅम बँकमन-फ्राइड
Nirmala Sitharaman : परकीय कारणांमुळे भारतात महागाई वाढली; सीतारामन यांचं विधान

सॅम बँकमन-फ्राइडचा जन्म कॅलिफोर्नियामध्ये 1992 मध्ये झाला होता, त्यांचे वडील स्टॅनफोर्ड विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यांना आता SBF म्हणूनही ओळखले जाते. फ्राइड यांनी २०१४ मध्ये मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून भौतिकशास्त्रात पदवी प्राप्त केली. यावेळी त्यांनी फ्राइडचे जवळचे सहकारी आणि भावी व्यावसायिक भागीदार गॅरी वांग फ्राइड यांचीही भेट झाली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर, एसबीएफने न्यूयॉर्क मधील जेन स्ट्रीट कॅपिटलमध्ये काम केले. 2017 मध्ये अल्मेडा रिसर्च नावाची क्रिप्टो ट्रेडिंग फर्म सुरू केली. आल्मेडा डिजिटल मालमत्ता उत्पादने आणि त्यांचे डेरिव्हेटिव्ह्ज देखील सांभाळत होते. दोन वर्षे ट्रेडिंग फर्म चालवल्यानंतर, बँकमन-फ्राइडने 2019 मध्ये गुगलचे माजी अभियंता वांग सोबत क्रिप्टो एक्सचेंज FTX सुरू केले. वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी फ्राइडने अब्ज डॉलर्सची संपत्ती कमावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com