चालू खात्यावरील शिलकीत जर्मनीच अव्वल राहणार

यूएनआय
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

बर्लिन - जर्मनीची चालू खात्यावरील शिल्लक या वर्षीही जगात सर्वांत जास्त राहण्याचा अंदाज ‘इफो’ या आर्थिक संस्थेने सोमवारी व्यक्त केला. यामुळे जर्मनीच्या चॅंसेलर अँजेला मर्केल यांची आर्थिक व वित्तीय धोरणे टीकाकारांकडून पुन्हा लक्ष्य होण्याची शक्‍यता आहे. 

वस्तूंचा ओघ, सेवा आणि गुंतवणूक यांचे मोजमाप चालू खात्यावरील शिलकीत होते. चालू वर्षात चालू खात्यावरील शिल्लक २९९ अब्ज डॉलरवर जाईल. सलग तिसऱ्या वर्षात यात वाढ होण्याचा अंदाज आहे. जपान २०० अब्ज डॉलरच्या चालू खात्यावरील शिलकीसह दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्‍यता आहे.

आंतरराष्ट्रीय नाणे निधी आणि युरोपीय आयोगाने जर्मनीला देशांतर्गत मागणी आणि आयात वाढविण्यासाठी पावले उचलण्याची सूचना केली आहे.

अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी आणि जागतिक असमतोल कमी करण्यासाठी ही पावले आवश्‍यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Web Title: The current account balance will be Germany top