esakal | ग्राहकांसाठी मोठी बातमी : स्टेट बँकेच्या एटीएममधून १० हजारांपेक्षा अधिक रक्कम काढता येणार
sakal

बोलून बातमी शोधा

2state_bank_of_india_0

एटीएममधून पैसे काढताना ग्राहकांना बऱ्याच वेळेस फसवणुकीला सामोरे जावे लागत आहे. या फसवणुकीपासून वाचविण्यासाठी देशातील सर्वांत मोठी बँक भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) ग्राहकांसाठी ओटीपी आधारित एटीएम विड्रॉल सुविधा ता १ जानेवारीपासून सुरु केली होती. त्यानुसार रात्री आठ ते सकाळी आठवाजेपर्यंत जर एखाद्याने १० हजार किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम काढणार असाल तर ओटीपी द्यावा लागत होता.

ग्राहकांसाठी मोठी बातमी : स्टेट बँकेच्या एटीएममधून १० हजारांपेक्षा अधिक रक्कम काढता येणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : एटीएममधून पैसे काढताना ग्राहकांना बऱ्याच वेळेस फसवणुकीला सामोरे जावे लागत आहे. या फसवणुकीपासून वाचविण्यासाठी देशातील सर्वांत मोठी बँक भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) ग्राहकांसाठी ओटीपी आधारित एटीएम विड्रॉल सुविधा ता १ जानेवारीपासून सुरु केली होती. त्यानुसार रात्री आठ ते सकाळी आठवाजेपर्यंत जर एखाद्याने १० हजार किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम काढणार असाल तर ओटीपी द्यावा लागत होता. आता येथून पुढे संपूर्ण दिवसभरात दहा हजार किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम काढता येणार आहे.हा नवा नियम येत्या १८ सप्टेंबरपासून लागू होणार आहे.


यामुळे चोवीस तास ओटीपी आधारित एटीएम विड्रॉलअंतर्गत पैसे काढता येणार आहे. या सुविधेमुळे स्टेट बँक एटीएममधून पैसे काढणे अधिका सुरक्षित होणार आहे. बँकेच्या ग्राहकांची फसवणुक होणार नाही. ग्राहक दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून नेहमीप्रमाणे पैसे काढू शकतात. स्टेट बँकेच्या एटीएममधून दहा हजार किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम काढण्यासाठी ग्राहकांच्या बँकेकडे नोंदणी केलेल्या मोबाईलवर ओटीपी येईल.

महाराष्ट्र बँकेच्या खासगीकरणाने कोणाला फायदा! खातेधारकांचे काय होणार?

एकदा ग्राहकाने एटीएममध्ये काढायची रक्कम टाकली की एटीएम स्क्रीनवर ओटीपी विचारला जाईल, येथे तुम्हाला आलेला ओटीपी टाकायचा आहे.
बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सी.एस.शेट्टी (रिटेल व डिजिटल बँकिंग) म्हणाले, की एसबीआय तांत्रिक सुधारणांच्या माध्यमातून आणि सुरक्षा पातळीत वाढ करुन ग्राहकांना सुविधा व सुरक्षा देण्याला नेहमी अग्रक्रम देत आहे. आम्हाला खात्री आहे, की चोवीस ओटीपी प्रमाणित एटीएम पैसे काढल्यास एसबीआय ग्राहक सुरक्षित आणि जोखीममुक्त रोख पैसे काढण्याचा अनुभव घेतील.

ग्राहकांनी अशी मिळेल सुविधा
-स्टेट बँक एटीएममधून रक्कम काढताना ग्राहकांना पिन क्रमांकासह ओटीपी द्यावा लागेल. ओटीपी बँकेकडे नोंदणी केलेल्या मोबाईलवर येईल.
-बँकेची ओटीपी आधारित एटीएम पैसे काढण्याची सुविधा फक्त दहा हजार रुपयांहून अधिक रक्कम काढल्यास मिळेल.
-बँकेच्या ग्राहकांची फसवणुक होणार नाही.

संपादन - गणेश पिटेकर