डेबिट, क्रेडिट कार्डवर CVV किंवा CVC कोड कशासाठी?

प्रमोद सरवळे
Thursday, 5 November 2020

हा एक प्रकारचा कोड आहे जो तुम्हाला तुमच्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डच्या मागच्या बाजूला आढळतो.

नवी दिल्ली: सध्या कोरोनाकाळात बरेच जण घरून ऑनलाईन खरेदी करताना दिसत आहेत. या ऑनलाईन खरेदीवेळी आपण बऱ्याचदा डेबिट कार्डचा उपयोग करतो. ऑनलाईन व्यवहार करताना सीव्हीव्ही (CVV) आणि सीव्हीसी (CVC) कोड वापरतो. हे कोड टाकल्याशिवाय व्यवहार करता येत नाही. पण बऱ्याच जणांना नेमकं CVC आणि CVV कोड काय आहेत हा प्रश्न पडला असेल. नेमके हे कोड काय आहेत आणि याची सुरुवात कधीपासून झाली याबद्दल आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत. 

हे दोन्ही कोड डेबिट किंवा क्रेडिट कार्डाच्या पाठीमागे लिहलेले असतात. यास सीव्हीव्ही नंबरही म्हटलं जातं. ऑनलाईन व्यवहारादरम्यान पेमेंट कन्फर्म करताना याचा उपयोग केला जातो. सुरक्षेच्या दृष्टीने CVC कोड अतिशय महत्त्वाचा आहे आणि शक्यतो तो कोणासोबत शेअर करू नये.

Gold Prices: सोने, चांदीच्या दरात बाजारात पुन्हा उसळी

CVV किंवाी CVC कोड नेमकं काय आहे?
हा एक प्रकारचा कोड आहे जो तुम्हाला तुमच्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डच्या मागच्या बाजूला आढळतो. ऑनलाइन व्यवहार करताना हा क्रमांक विचारला जातो. CVV चा फूल फॉर्म  (Card Verification Value) आणि CVC चा फूल फॉर्म (Card Verification Code) आहे.

CVV चा इतिहास-
डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डवर काही कोड असतात ज्यांना कार्ड सिक्युरिटी कोड (CSC) म्हटलं जातं. याचा सुरुवात आणि शोध मायकल स्टोनने 1995 साली ब्रिटनमध्ये केली. CSCबद्दलची तपासणी झाल्यावर त्याला 'असोसिएशन ऑफ पेमेंट क्लिअरिंग सर्व्हिसेसने ही कल्पना स्विकारली होती. सुरुवातीला CVV कोड 11 अंकी होता, पण तो नंतर कमी करुन 3 ते 4 अंकांवर आणला गेला.

मारुती सुझुकीची ऑक्टोबरमध्येच दिवाळी!

Paytm, Frecharge किंवा इतर कोणत्याही ऍपद्वारे व्यवहारादरम्यान आपल्या कार्डचा तपशील भरताना तुम्हाला CVV कोड विचारला जातो. जर तुम्ही हा कोड वापरला नाही तर ते पेमेंट पुर्ण होत नाही.

सीव्हीव्ही कोडची गरज का आहे?
CVV कोड फक्त सुरक्षेसाठी वापरला जातो. त्याच्याशिवाय ऑनलाईन खरेदी करताना CVV कोडशिवाय पेमेंट करता येत नाही. हा कोड कार्डच्या मागच्या बाजूला असतो आणि जेव्हा-जेव्हा आपण सार्वजनिक ठिकाणी कार्ड वापरतो तेव्हा त्याचा वरचा भाग समोर असतो आणि कार्ड नंबर आणि एक्सपायरी डेट कळू शकतो. पण CVV कोड कार्डच्या मागच्या बाजूला असल्यामुळे तो समजत नाही तसेच कुणाला शेअरही करू नये.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cvv and cvc code on credit card and debit card