तोट्यातील उद्योगांवरील गुंतवणुकीने ‘टाटा’ला धोका : मिस्त्री

वृत्तसंस्था
बुधवार, 7 डिसेंबर 2016

मुंबई: टाटा समूहाने युरोपामधील तोट्यात असलेल्या उद्योगांवर केलेली गुंतवणूक समूहाला संकटात आणू शकते, असे सांगत "टाटा सन्स'चे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले. याचसोबत टाटा समूह युरोपातील गुंतवणुकीकडे अल्पकालीन आर्थिक चष्म्यातून पाहत असल्याचेही मिस्त्रींचे म्हणणे आहे.

मुंबई: टाटा समूहाने युरोपामधील तोट्यात असलेल्या उद्योगांवर केलेली गुंतवणूक समूहाला संकटात आणू शकते, असे सांगत "टाटा सन्स'चे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले. याचसोबत टाटा समूह युरोपातील गुंतवणुकीकडे अल्पकालीन आर्थिक चष्म्यातून पाहत असल्याचेही मिस्त्रींचे म्हणणे आहे.

सायरस मिस्त्री यांनी टाटा स्टीलच्या अध्यक्षपदावरून हटविण्यासंदर्भात टाटाच्या विश्‍वस्त मंडळाचा विचार आहे. या पार्श्‍वभूमीवर मिस्त्रींनी आपला बचाव करत भूमिका स्पष्ट केली. मिस्त्री यांची याआधीच टाटा समूहाच्या विविध कंपन्यांच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. मिस्त्रींनी ब्रिटनमधील गुंतवणुकीला तात्पुरत्या फायद्याच्या दृष्टिकोनातून पाहिल्याच्या आरोपाचे खंडन करत टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून केलेली हकालपट्टी बेकायदेशीर असल्याचा पुनर्रुच्चार केला.

मिस्त्री यांनी सोमवारी आगामी सर्वसाधारण सभेत टाटा सन्समधील नुस्ली वाडिया यांच्या हकालपट्टीच्या ठरावाविरोधात मतदान करण्याचे आवाहन समाभागधारकांना केले होते. तात्पुरत्या फायद्यातून युरोपातील उद्योगांमध्ये गुंतवणुक होत असल्याचा आडाखा बांधला जात असला, तरी हे सत्यापासून फार दूर आहे, असेही मिस्त्री यांनी नमूद केले आहे. "टाटा'च्या युरोपातील पोलाद उद्योगाची वाढ 2012 मधील 67 हजार कोटी रुपयांवरून 2015 मध्ये 93 हजार 500 कोटी रुपयांवर पोचविल्याचा दावा मिस्त्री यांनी केला. युरोपातील नफ्यात असलेल्या कंपन्यांवर लक्ष केंद्रित केल्याच्या आरोपावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, की कंपनीच्या दीर्घकालीन विचार करता दहा लाख भागधारकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे होते. याच भागधारकांनी गेल्या दशकभरापासून "टाटा'च्या योगदानात भर पाडली आहे. युरोपीय उद्योगांसमोरील आव्हानांचा सामना करण्याचे आमचे प्रयत्न होते. संभाव्य निवृत्तिवेतनातील तूट, उच्च ऊर्जा खर्च आणि वाढत्या करांचा विचार करूनच पावले उचलल्याचे सांगत मिस्त्री यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले.

Web Title: Cyrus Mistry questions Tata group investments