Today's Panchang 30 जुलै 2022: निळे वस्त्र परिधान करणे आज शुभ ठरेल |Aajache Panchang | Daily Panchang in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aajache Panchang | Daily Panchang in Marathi

Today's Panchang 30 जुलै 2022: निळे वस्त्र परिधान करणे आज शुभ ठरेल

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ *डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ३० जुलै २०२२ (daily panchang 30 july 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक* श्रावण ८ शके १९४४

आज सूर्योदय ०६:१४ वाजता तर सूर्यास्त १९:०६ वाजता होणार. आज चंद्रोदयाची वेळ ही ०६:२८ वाजता तर प्रात: संध्या स.०५:०८ ते स.०६:१४ दरम्यान होणार. आज सायं संध्या १९:०६ ते २०:१३ दरम्यान होणार तर अपराण्हकाळ हा १३:५७ ते १६:३२ दरम्यान असणार. आज प्रदोषकाळ १९:०६ ते २१:१८ दरम्यान असणार तर निशीथ काळ हा २४:१८ ते २५:०२ दरम्यान असणार. आज राहु काळ हा ०९:२८ ते ११:०५ असणार तर यमघंट काळ हा १४:१७ ते १५:५४ दरम्यान असणार. आज श्राद्धतिथी ही द्वितीया श्राद्ध आहे.

सर्व कामांसाठी सायं.०७:२३ नं.शुभ दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:०६ ते दु.०१:५८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. या दिवशी तोंडली खावू नये. या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.

हेही वाचा: Today's Panchang 29 जुलै 2022: पांढरे वस्त्र परिधान करणे आज शुभ ठरेल

लाभदायक

लाभ मुहूर्त - १४:१७ ते १५:५४

अमृत मुहूर्त - १५:५४ ते १७:३०

विजय मुहूर्त - १४:५३ ते १५:४२

पृथ्वीवर अग्निवास २५:०३ नं. Trरवि मुखात आहुती आहे. शिववास गौरीसन्निध , काम्य शिवोपासनेसाठी अनुकूल दिवस आहे. शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - दक्षिणायन

  • ऋतु - वर्षा(सौर)

  • मास - श्रावण

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - द्वितीया(२५:०३ प.नं.तृतीया)

  • वार - शनिवार

  • नक्षत्र - आश्लेषा(११:३९ प.नं.मघा)

  • योग - व्यतिपात(१९:२२ प.नं.वरियान)

  • करण - बालव(१२:२३ प.नं. कौलव)

  • चंद्र रास - कर्क(११:३९ नं. सिंह)

  • सूर्य रास - कर्क

  • गुरु रास - मीन

हेही वाचा: Shravan 2022: श्रावण सोमवारी पुणे जिल्ह्यातील ‘या’ मंदिरांना द्या भेट

विशेष:- चंद्रदर्शन- मु.३०; चंद्रास्त-२०:३४ शनि-पिंपळ-नृसिंह-मारूती पूजन, *लक्ष्मीस कापसाचे पोवते अर्पण करावे, स्वामी करपात्री जयंती

या दिवशी पाण्यात दारूहळद वनस्पतीचे चूर्ण टाकून स्नान करावे. दशरथ विरचित शनि स्तोत्राचे पठण करावे. ‘शं शनैश्चराय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. शनिदेवांना काळ्या मनुकांचा नैवेद्य दाखवावा. सत्पात्री व्यक्तीस काळे वस्त्र दान करावे. दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना काळे उडीद खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, कर्क, कन्या, तुळ,मकर, कुंभ या राशिंना स.११:३९ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

Web Title: Daily Panchang 30 July 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SanskrutiPanchang