डेलीहंट चालवणाऱ्या VerSe Innovationने अल्पावधीत ओलांडला $80 कोटींचा टप्पा

डेलीहंट चालवणाऱ्या VerSe Innovationने अल्पावधीत ओलांडला $80 कोटींचा टप्पा

न्यूज एग्रीगेटर डेलीहंट आणि शॉर्ट व्हिडीओ अॅप जोशचे निर्माते VerSe Innovation अल्पावधीतच वेगाने मार्गक्रमण करत आहे. त्यांनी आज 6 एप्रिल रोजी सांगितलंय की, अलीकडच्या काही महिन्यांमध्ये टेक्नॉलॉजी स्टॉक्सवर दबाव येत असतानाही त्यांच्याप्रती गुंतवणूकदारांची भावना ही पाठिंबा देणारीच राहिली आहे. त्यामुळेच त्यांनी $5 अब्जच्या व्हॅल्यूएशनमधून तब्बल $805 दशलक्षचा टप्पा गाठला आहे. (Dailyhunt)

डेलीहंट चालवणाऱ्या VerSe Innovationने अल्पावधीत ओलांडला $80 कोटींचा टप्पा
Sri Lanka Crisis: श्रीलंकन राष्ट्रपती राजपक्षेंनी आणीबाणी घेतली मागे

येत्या काळात स्टार्टअप या पैशांचा वापर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगच्या (artificial intelligence/machine learning - AI/ML) क्षमतांना बळकट करण्यासाठी तसेच लाइव्ह स्ट्रीमिंग आणि वेब 3.0 सारख्या नवीन प्रयोगांमध्ये वापरणार आहे. यामध्ये या पैशांची गुंतवणूक करण्यात येणार असून शेअरचॅट सारख्या देशी प्रतिस्पर्धी तसेच Instagram, युट्युबसारख्या जागतिक स्पर्धकांशी देखील मुकाबला करता यईल.

डेलीहंटचे $805 दशलक्ष आतापर्यंत या यादीत अव्वल स्थानावर आहे, त्यानंतर स्विगीने $700 दशलक्ष जमा केले आहेत. $400 दशलक्ष पेक्षा जास्त कमावलेल्यांपैकी पॉलिगॉन, बायजू आणि युनिफोर या स्टार्टअप्सचा समावेश आहे. VerSe Innovation ची स्थापना वीरेंद्र गुप्ता आणि शैलेंद्र शर्मा यांनी 2007 मध्ये केली होती. उमंग बेदी फेब्रुवारी 2018 मध्ये या फर्ममध्ये सामील झाले. TikTokवर बंदी आल्यानंतर कंपनीने 2020 मध्ये शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म Josh लाँच केले. सध्या त्यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. गुप्ता आणि बेदी यांनी एका निवेदनात म्हटलंय की, "ही पार्टनरशीप आमच्या येत्या काळातील अब्जावती युझर्सना आर्टीफिशीयल इंटेलिजन्सवर आधारित स्थानिक भाषेतील कंटेट देईल. या दृष्टीकोनातूनन आमची क्षमता आणि नेतृत्व येत्या काळात अधिकाधिक मजबूत होईल.

डेलीहंट चालवणाऱ्या VerSe Innovationने अल्पावधीत ओलांडला $80 कोटींचा टप्पा
दिल्लीत रंगलं स्नेहभोजन! पवारांच्या घरी गडकरी, तर दानवेंच्या कार्यक्रमात रोहित पवार

“व्हिडिओ सामग्री आणि भारतासाठी तयार करण्यावर धोरणात्मक लक्ष केंद्रित करून, आम्ही प्रादेशिक भारतातून बाहेर पडणाऱ्या पुढील अब्ज वापरकर्त्यांमधून स्फोटक वाढ झाल्याचे पाहिले आहे. ही गुंतवणूक अशा वेळी आली आहे जेव्हा आम्ही आमच्या ऑफरिंग, कमाई मॉडेल्स, जगासाठी उत्कृष्ट वेब 3.0 अनुभव वितरीत करण्याच्या आणि IPO-स्केल व्यवसाय तयार करण्याच्या मार्गावर आहोत,” ते पुढे म्हणाले. VerSe Innovation चे तीन प्रमुख प्लॅटफॉर्म आहेत: Dailyhunt, Josh आणि PublicVibe.

डेलीहंटचे 350 दशलक्ष पेक्षा जास्त युझर्स आहेत. जोश या शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्मचे 150 दशलक्ष मासिक सक्रिय युझर्स आहेत. आणि या प्लॅटफॉर्मवरुन या महिन्यापासून कमाई करण्याचा प्रयत्न करणार आहे. PublicVibe हा एक हायपरलोकल व्हिडिओ प्लॅटफॉर्म असून त्याचे पाच दशलक्षाहून अधिक मासिक सक्रिय वापरकर्ते आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com