बुडीत कर्जांच्या तोडग्यासाठी मुदतवाढ

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

मुंबई - बुडीत कर्जांवर तोडगा काढण्यासाठी बॅंकांना आणखी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. 

रिझर्व्ह बॅंकेने दिलेली १८० दिवसांची मुदत सोमवारी (ता.२७) संपुष्टात आली. त्यामुळे बुडीत कर्जखाती दिवाळखोरीसाठी वर्ग करावी लागणार होती. मात्र, आता १५ दिवसांची वाढीव मुदत मिळाली असल्याने बॅंकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे. बॅंकांनी कायदेशीर सल्लागार आणि बुडीत कर्जांबाबत तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करून बुडीत कर्जांवर उपाययोजना कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्या असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

Web Title: dead loan solution reserve bank of india