जेट एअरवेजचे प्रवाशी राहणार उपाशी

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

मुंबई: आर्थिक संकटातून जात असलेल्या जेट एअरवेजने आता इकॉनॉमी क्लासने देशात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोफत जेवण न देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचा खर्च कमी करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. मात्र इकॉनॉमी क्लासमधील प्रवासी जेवण विकत घेऊ शकणार आहे. जेट एअरवेज विमान कंपनी सध्या आर्थिक संकटातून जात आहे. कंपनीला एक हजार 261 कोटी रुपयांचा तोटा झाला असल्याची माहिती जेट एअरवेज दिली आहे. 

जेट एअरवेजच्या इकॉनॉमी क्लासमध्ये पाच विविध श्रेणी आहेत. त्यामधील दोन श्रेणींमध्ये कंपनीने मोफत जेवणाची सोय या आधीच बंद केली आहे. आता येत्या 7 जानेवारीपासून आणखी दोन श्रेणींसाठी मोफत जेवण बंद करण्यात येणार आहे. बिझनेस क्लाससाठी आणि इकॉनॉमी क्लासमधून परदेशात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मात्र मोफत जेवण मिळणार आहे. काल देखील कंपनीने 14 फेऱ्या रद्द केल्या होत्या. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Debt-Laden Jet Airways To Stop Free Meals In Select Booking Classes