परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी योग्य तो निर्णय - टाटा सन्स

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

सायरस मिस्त्री यांच्या हकालपट्टीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी काहीही करण्याची तयारी आहे, अशी माहिती टाटा सन्सने रविवारी दिली. या परिस्थतीत योग्य वाटेल तो निर्णय घेण्यात येईल, असेही नमूद करण्यात आले आहे. 

टाटा सन्सने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की समूहाच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांना हटविण्याबाबत सर्व माहिती १० नोव्हेंबरच्या निवेदनात आधीच दिलेली आहे. मिस्त्री यांना हटविल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी योग्य वाटेल तो निर्णय घेण्यात येईल. समूहातील अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळासह स्वतंत्र संचालकांना कंपन्यांचे भवितव्य संरक्षित राहावे, यासाठी मते मांडण्याचे आवाहन करण्यात आले होते. संचालक मंडळ आणि स्वतंत्र संचालकांनी समूहाच्या हिताला प्रथम प्राधान्य द्यावे.

Web Title: The decision to remove the right way for the situation