‘एच1-बी’धारकांच्या संख्येत घट

पीटीआय
बुधवार, 9 मे 2018

वॉशिंग्टन - गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत गेल्या वर्षीच्या नवीन नियमांनुसार भारतीयांना मिळणाऱ्या एच१-बी व्हिसाधारकांच्या संख्येत यंदा घट झाली आहे. या संदर्भातील अहवाल अमेरिकेत नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. 

२०१६ मध्ये अमेरिकेने वाटप केलेल्या एकूण एच१-बी व्हिसाचा सुमारे ७४.२ टक्के वाटा भारतीयांच्या वाट्याला आला होता. त्यापुढील वर्षीही एच१- बी व्हिसाधारकांच्या संख्येत वाढ होऊन ती ७५.६ टक्के झाल्याचे सरकारी अहवालात म्हटले आहे. मात्र, नवीन नियमांच्या एच१-बी लाभार्थ्यांच्या संख्येत घट झाली आहे. २०१७ च्या आर्थिक वर्षात ‘एच १-बी’ व्हिसाधारकांच्या लाभार्थ्यांत ४.१ टक्‍क्‍यांनी घट झाली आहे.

व्हिसाधारक भारतीय (2017)
२५ ते ३४ वयोगटातील ६६.२ टक्के
नोकरीबरोबरच पदवी घेणारे ४५.२ टक्के
एम.एस. बरोबरच नोकरी करणारे ४४.५ टक्के
डॉक्‍टरेट करणारे नागरिक ६.८ टक्के
संगणकक्षेत्राशी निगडित ६९.८ टक्के

Web Title: Decrease in the number of H1-B Visa Holder