इंधनाची मागणी घटणार 

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 मे 2018

लंडन : जागतिक पातळीवर इंधनाची मागणी चालू वर्षात कमी राहणार आहे. कच्च्या तेलाचा भाव प्रतिबॅरल ८० डॉलरपर्यंत गेल्याने महत्त्वाचे तेल आयातदार देश ग्राहकांना देण्यात येणारे इंधन अंशदान बंद करीत असल्यामुळे मागणी घटेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने (आयईए) वर्तविला आहे. जागतिक इंधन मागणीतील वाढ या वर्षी १५ लाख बॅरल प्रतिदिन असेल, असा अंदाज याआधी ‘आयईए’ने व्यक्त केला होता. आता हा अंदाज कमी करून १४ लाख बॅरल प्रतिदिनवर आणण्यात आला आहे. गेल्या वर्षी कच्च्या तेलाच्या भावात ५१ टक्के वाढ झाली.  

Web Title: Demand for fuel will decrease

टॅग्स