नोटाबंदीने ‘व्हॅक्‍यूम क्‍लीनर’प्रमाणे नोटा शोषल्या: आयएमएफ

वृत्तसंस्था
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

आंतरराष्ट्रीय नाणे निधीची टीका; नव्या नोटा चलनात येण्याचा वेग संथ

वॉशिंग्टन: भारतातील नोटाबंदीमुळे मोठ्या प्रमाणात रोकड टंचाई निर्माण झाली असून, बाजारपेठेतील मागणीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. "व्हॅक्‍यूम क्‍लीनर'प्रमाणे नोटाबंदीत नोटा शोषल्या गेल्या असून, आता संथपणे नव्या नोटा चलनात येत आहेत, अशी टीका आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या (आयएमएफ) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली आहे.

"आयएमएफ'चे आशिया व प्रशांत विभागाचे सहायक संचालक पॉल ए. कॅशिन म्हणाले, ""अपारंपरिक अशा पतधोरणामुळे हेलिकॉप्टरमधून पैसे पोचविण्याचे आपण ऐकले आहे. नोटाबंदीतही एकप्रकारे "व्हॅक्‍यूम क्‍लीनर'प्रमाणे नोटा शोषून घेतल्या आहेत. आता "व्हॅक्‍यूम क्‍लीनर'मधून पुन्हा उलट दिशेने संथपणे नोटा चलनात आणण्यात येत आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात रोकड टंचाई निर्माण झाली असून, बाजारपेठेतील मागणीवर प्रतिकूल परिणाम होत आहे.''

"रोकड टंचाईमुळे विकासाचा वेग मंदावला आहे. यामुळे थकीत कर्जांचे प्रमाण वाढण्याची शक्‍यता असून, यंत्रणांनी याबाबत दक्ष राहायला हवे. विशेषत: कंपन्यांच्या बाबतीत ही समस्या निर्माण होईल. चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 6.6 टक्के राहील. पुढील आर्थिक वर्षात तो 7.2 टक्‍क्‍यांवर जाणे अपेक्षित आहे. नोटाबंदीचे परिणाम मार्चनंतर कमी होतील. यानंतर चांगला मॉन्सून आणि तेलाच्या कमी किमती यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळू शकते,'' असे कॅशिन यांनी नमूद केले.

भारत सरकारने नोटांचा पुरवठा वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. सध्याच्या परिस्थितीत गरज पडल्यास रद्द नोटा वापरण्याची सवलत द्यायला हवी. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागात ही सवलत द्यावी. 
- पॉल ए. कॅशिन, आशिया व प्रशांत विभाग सहायक संचालक, आयएमएफ

Web Title: Demonetisation: IMF official says note ban sucked in cash like a vacuum cleaner