'जन-धन' खात्यात तब्बल 64 हजार कोटी जमा

वृत्तसंस्था
शनिवार, 26 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली: नोटाबंदीच्या निर्णयामुळे प्रधानमंत्री जन-धन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या खात्यांतील रोख रकमांमध्ये वाढ होत आहे.

आतापर्यंत ही रक्कम 64 हजार 252.15 कोटी रुपयांवर पोचली आहे. जन-धन योजनेअंतर्गत खात्यात अधिक धनराशी जमा झालेल्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशमधील खात्यामध्ये 10 हजार 670 कोटी जमा झाले आहेत. त्यानंतर पश्‍चिम बंगाल आणि राजस्थान या राज्यांचा नंबर लागतो. केंद्र सरकारने शुक्रवारी जन-धन योजनेतील खात्यांविषयीची माहिती प्रसिद्ध केली.

कोणत्याही सरकारी बॅंकेने आपल्या अधिकाऱ्यांना जन-धन खात्यामध्ये पैसे भरण्यास सांगितले नसल्याचेदेखील सरकारने स्पष्ट केले आहे. काही अहवालामध्ये अधिकाधिक खात्यांमध्ये बॅंक अधिकाऱ्यांनी किंवा दोन रुपये जमा केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांनी लोकसभेत लिखित स्वरूपात दिलेल्या स्पष्टीकरणामध्ये ही माहिती दिली.

Web Title: Deposits in Jan Dhan accounts rise to Rs 64250 crore