बॅंक खात्यांचे तपशील स्वयंसेवी संस्थांनी द्यावेत

वृत्तसंस्था
शनिवार, 24 जून 2017

गृह मंत्रालयाची सूचना; कारवाईचा इशारा

नवी दिल्ली: परकी निधी स्वीकारत असलेल्या 1 हजार 927 स्वयंसेवी संस्थांनी बॅंक खात्याचे तपशील द्यावेत अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा गृह मंत्रालयाने दिला आहे.

गृह मंत्रालयाची सूचना; कारवाईचा इशारा

नवी दिल्ली: परकी निधी स्वीकारत असलेल्या 1 हजार 927 स्वयंसेवी संस्थांनी बॅंक खात्याचे तपशील द्यावेत अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा गृह मंत्रालयाने दिला आहे.

परकी निधी मिळविण्यासाठी पात्र स्वयंसेवी संस्थांना नियमानुसार विदेशातून एकाच बॅंक खात्यात निधी स्वीकारता येतो. या खात्यांचे तपशील देण्याचे निर्देश 2 हजार 25 स्वयंसेवी संस्थांना गृह मंत्रालयाने 7 जूनला दिले होते. अद्याप 1 हजार 927 स्वयंसेवी संस्थांनी बॅंक खात्यांचे तपशील दिलेले नाहीत. त्यामुळे मंत्रालयाने या स्वयंसेवी संस्थांना नोटीस बजावली आहे. स्वयंसेवी संस्थांनी तातडीने बॅंक खात्याची माहिती द्यावी, अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.

गृह मंत्रालयाने दुसऱ्या एका आदेशात म्हटले आहे, की परकी निधी स्वीकारणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी लेखापरीक्षण अहवाल सादर करावेत. यात प्राप्ती आणि खर्चाचे तपशील सरकारला सादर करावे लागतील. सर्व स्वयंसेवी संस्थांनी आर्थिक वर्षाच्या नऊ महिन्यांपर्यंत आर्थिक वर्षाचे सर्व तपशील जाहीर करावेत. देशभरात 20 हजार स्वयंसेवी संस्थांनी परकी निधी मिळविण्यासाठी सरकारकडे नोंदणी केली आहे. गृह मंत्रालयाने लेखापरीक्षण अहवाल सादर न करणाऱ्या दहा हजार स्वयंसेवी संस्थांवर कारवाई करण्यासाठी पावले उचलली आहेत.

 

Web Title: Details of bank accounts should be provided by voluntary organizations

टॅग्स