महागाईचा भडका : पेट्रोलनंतर डिझेलही शंभरीपार

महागाईचा भडका : पेट्रोलनंतर डिझेलही शंभरीपार

Petrol Price Today : भारत आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवर असलेल्या राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये डिझेलच दर प्रति लीटर 100 रुपये झाला आहे. डिझेलचे दर 100 रुपयांचे पुढे जाणारं देशातील हे पहिलेचं शहर आहे. श्रीगंगानगरमध्ये पेट्रोलचे दर सध्या देशात सर्वाधिक असून येथे पेट्रोल प्रति लीटर 107.23 रुपये असं मिळत आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्यानं वाढ होत असल्याचं दिसत आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर चार मे पासून आतापर्यंत सातत्यानं पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. मागील 40 दिवसांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये एकदाही घसरण झाली नाही. फक्त वाढ अथवा दर स्थिर राहिले आहेत. मागील चाळीस दिवसांत जवळपास पाच ते सात रुपयांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लीटर वाढले आहेत.

राज्यस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये डिझेलनं शंभरी ओलांडली आहे. श्रीगंगानगरमध्ये डिझेल 25 पैशांनी वाढून 100.06 रुपये प्रति लीटर झालं आहे. डिझेलचे दर 100 रुपयांच्या पुढे जाणारं श्रीगंगानगर पहिलं राज्य आहे. राज्यस्थानमधील इतरही काही जिल्ह्यात डिझेलचे दर प्रति लीटर शंभर रुपयाजवळ पोहचले आहेत.

महागाईचा भडका : पेट्रोलनंतर डिझेलही शंभरीपार
दाढीमुळे कोरोनाचा धोका वाढतो; वाचा कारण

राज्यस्थानशिवाय मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशमध्ये काही ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलच्या दरानं उच्चांक गाठला आहे. इतर ठिकाणापेक्षा येथील दर जास्त आहेत. मागील पाच ते सहा आठवड्यात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये सातत्यानं वाढ पाहायला मिळत आहे. परिणामी भारतातील इंधन दराचा भडका उडाला आहे. शनिवारी देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 22-32 पैसे प्रति लीटर वाढ केली आहे.

महागाईचा भडका : पेट्रोलनंतर डिझेलही शंभरीपार
मुंबई-दिल्लीमध्ये तिसरी लाट नाही, तज्ज्ञांनी सांगितलं कारण

शनिवारी राजधानी दिल्लीमध्ये प्रति लीटर पेट्रोल 96.12 रुपये आणि डिझेल 86.98 रुपये झालं आहे. तर मुंबईमध्ये पेट्रोल प्रतिलीटर 26 पैशांनी वाढून 102.30 रुपये झालं आहे. तर डिझेल 24 पैशांनी वाढून 94.39 रुपये झालं आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 24 पैशांनी महागून प्रतिलीटर 97.43 रुपये तर डिझेल 22 पैशांनी वाढून 91.64 रुपये प्रति लीटर झालं आहे. कोलकातामध्ये पेट्रोल प्रतिलीटर 96.06 रुपये तर डिझेल 89.83 रुपये आहे. कोलकातामध्ये शनिवारी प्रति लीटर पेट्रोल 26 पैशांनी तर डिझेल 23 पैशांनी महागलं.

महागाईचा भडका : पेट्रोलनंतर डिझेलही शंभरीपार
Inspiring Journey : दहावी नापास रिक्षावाला पोहोचला स्वित्झर्लंडला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com