दिलीप बिल्डकॉनचा शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

मुंबई: दिलीप बिल्डकॉनच्या शेअरने आज(मंगळवार) 306.85 रुपयांवर 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे. कंपनीने मध्यप्रदेशातील प्रकल्पाचे काम पुर्ण केल्याची माहिती शेअर बाजारात कळविल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये तेजी निर्माण झाली आहे.

कंपनीने मध्यप्रदेशातील मंडला-पिंड्रई आणि सलिम्नाबाद-विलायतकला जिल्हा मार्ग आणि आजूबाजूच्या मार्गांच्या पुनर्वसन आणि सुधारणा प्रकल्पाचे काम पुर्ण केले आहे. या प्रकल्पाची किंमत 190.80 कोटी रुपये आहे. हा प्रकल्प मुदतीपुर्वी 185 दिवस आधी पुर्ण झाला असून कंपनीला मध्यप्रदेश रस्तेविकास मंडळाकडून 3 टक्के अर्थात 5.72 टक्के बोनस मिळणार आहे, अशी माहिती दिलीप बिल्डकॉनने शेअर बाजारात दिली आहे.

मुंबई शेअर बाजारात दिलीप बिल्डकॉनचा शेअर 300 रुपयांवर उघडला. त्यानंतर शेअरने 300 रुपयांवर दिवसभराची नीचांकी तसेच 306.85 रुपयांवर दिवसभराची तसेच 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी गाठली. सध्या(10 वाजून 20 मिनिटे) कंपनीचा शेअर 304.65 रुपयांवर व्यवहार करत असून 2.01 टक्क्यांनी वधारला आहे.

Web Title: Dilip Buildcon shares at 52-Week-High