जेट एअरवेजवरील संकट गडद

पीटीआय
गुरुवार, 3 जानेवारी 2019

नवी दिल्ली - हवाई क्षेत्रातील खासगी विमान कंपनी जेट एअरवेजवरील आर्थिक संकट गडद झाले आहे. मार्चपासून सातत्याने तोट्यात असलेली आणि कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यास दिरंगाई करणारी जेट एअरवेज बॅंकांची कर्जफेड करण्यास अपयशी ठरली. तात्पुरत्या रोकड टंचाईमुळे डिसेंबरअखेरचा कर्ज आणि व्याजाचा हप्ता भरता आला नाही, असे कंपनीने म्हटले आहे. 

स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली बॅंकांनी जेट एअरवेजला कर्जे दिली आहेत. विमान इंधनाचे वाढते दर, डोईजड कर्जे आणि तीव्र स्पर्धेमुळे जेट एअरवेज आर्थिक डबघाईला आली आहे. आर्थिक अनियमिततेच्या संशयावरून स्टेट बॅंकेकडून जेट एअरवेजचे ‘फॉरेन्सिक ऑडिट’ केले आहे. मार्चपासून प्रत्येक तिमाहीत कंपनीला एक हजार कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. त्यामुळे पतमानांकन संस्था ‘इक्रा’ने जेटच्या मानांकनात कपात केली.

निधीसाठी पर्यायांची चाचपणी
कर्जफेडीसाठी कंपनीकडून निधी उभारण्याच्या पर्यायांची चाचपणी सुरू आहे. कंपनी स्टेट बॅंक ऑफ इंडियाकडून अल्प मुदतीची १ हजार ५०० कोटी रुपयांचे कर्ज घेण्याची शक्‍यता आहे. जेट एअरवेजला डिसेंबर २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीसाठी १ हजार ७०० कोटी, आर्थिक वर्ष २०२० मध्ये २ हजार ४४४ कोटी आणि आर्थिक वर्ष २०२१ मध्ये २ हजार १६७.९ कोटी रुपयांचे कर्ज फेडावे लागणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disaster on Jet Airways