डिश टीव्ही-व्हिडिओकॉन विलीनीकरण ऑक्टोबरमध्ये पुर्ण होणार

वृत्तसंस्था
सोमवार, 17 एप्रिल 2017

नवी दिल्ली: डीटीएच सेवा देणाऱ्या डिश टीव्ही आणि व्हिडिओकॉन या दोन प्रमुख कंपन्यांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया येत्या ऑक्टोबरपर्यंत पुर्ण होण्याची शक्यता आहे. सर्व औपचारिक प्रक्रिया पुर्ण होताच विलीनीकरण पुर्ण करण्याच डिश टीव्हीचा मानस आहे. नव्याने तयार होणाऱ्या कंपनीचा 27.2 दशलक्ष एवढा ग्राहकवर्ग असेल.

"आम्हाला सीसीआय, एनसीएलटी आणि शेअर बाजारांकडून परवानगी मिळाली आहे. सर्व औपचारिकता पुर्ण झाल्यावर येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत विलीनीकरण पुर्ण होण्याचा अंदाज आहे", असे डिश टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण कपूर म्हणाले.

गेल्यावर्षीच्या नोव्हेंबरमध्ये दोन्ही कंपन्यांनी विलीनीकरणाविषयी घोषणा केली होती. दोन्ही कंपन्यांच्या संचालक मंडळांनी या योजनेस मंजुरी दिली आहे. नव्या कंपनीचे नाव 'डिश टीव्ही व्हिडिओकॉन' असे ठेवण्यात येणार आहे. एकत्रीकरण योजनेअंतर्गत 85.7791 कोटी शेअरचे वाटप केले जाणार आहे. व्हिडिओकॉन डीटूएचच्या गुंतवणूकदारांना कंपनीतील एका शेअरसाठी डिश टीव्ही व्हिडिओकॉनचे 2.021 शेअर्स दिले जाणार आहेत. या एकत्रीकरणानंतर डिश टीव्ही व्हिडिओकॉनची शेअर बाजारातील नोंदणी कायम राहणार आहे.

Web Title: Dish TV expects to complete merger with Videocon d2h by Oct