esakal | कोरोनामुळे भारतात मंदीचे सावट; 8.6 टक्क्यांनी घसरू शकतो GDP
sakal

बोलून बातमी शोधा

rbi news

कोरोनाचा मोठा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होत आहे. आता आरबीआयचा अंदाज मोठी चिंता वाढवणारा आहे.

कोरोनामुळे भारतात मंदीचे सावट; 8.6 टक्क्यांनी घसरू शकतो GDP

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: कोरोनाच्या महामारीमुळे जगभरातील व्यापार ठप्प पडला आहे. त्यामुळे जागतिक अर्थचक्र बऱ्यापैकी थंडावल्याचं दिसत आहे. मागील महिन्यात जगभरातील कोरोना रुग्ण कमी होत होते. पण आता युरोपसोबत अमेरिकेतही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे पुढील काळ जागतिक बाजारपेठेसाठी मोठा नुकसानकारक असणार आहे. याचा मोठा फटका भारतालाही बसला आहे. 

भारतातही कोरोनामुळे सरकारने लॉकडाऊन जाहीर केलं होतं. आता देशात अनलॉकची प्रक्रियाही सुरु झाली आहे. याचा मोठा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झाला होता. आता आरबीआयने अजून एक चिंता वाढवणारी बातमी दिली आहे. ज्यामध्ये 2020-21 च्या दुसऱ्या तिमाहीत जीडीपी मागील वर्षाच्या तुलनेत 8.6 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यापुर्वीच भारताची आर्थिक परिस्थिती नाजूक स्थितीत आहे.

Gold Prices: तीन दिवसांत 2 वेळा सोन्याचे दर घसरले; आजही सोने, चांदीच्या दरात घट

जर आरबीआयचं भाकित खरं ठरलं तर देशात मोठी आर्थिक मंदी येणार आहे. 31 ऑगस्ट रोजी  राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयने एप्रिल-जूनमध्ये जीडीपीमध्ये 23.9 टक्क्यांनी अभूतपूर्व घट नोंदवली. आता जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादनाचे (जीडीपी)  8.6 टक्के होण्याचा अंदाज आहे. 

Share Market: आतापर्यंतची सर्वोत्तम सुरुवात! पहिल्यांदाच सेन्सेक्स 43 हजारांपेक्षा जास्त अंशांनी उघडला

आरबीआयने प्रसिद्ध केलेला अहवाल संशोधक पंकज कुमार यांनी तयार केला आहे. अहवालानुसार, तांत्रिकदृष्ट्या 2020-21 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत भारतात आर्थिक मंदीची परिस्थिती निर्माण झाली. आता हळूहळू जेव्हा अर्थव्यवस्था सामान्य होत आहेत, अशातच ही जीडीपी घटण्याची बातमी समोर आली आहे.

(edited by- pramod sarawale)
 

loading image