Share Market : ऋषी सुनक पंतप्रधान होताचं Muhurat Trading तेजीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market : ऋषी सुनक पंतप्रधान होताचं Muhurat Trading  तेजीत

Share Market : ऋषी सुनक पंतप्रधान होताचं Muhurat Trading तेजीत

सुनक ब्रिटीश पंतप्रधान झाल्याच्या बातमीने मुहूर्ताच्या व्यवहारात उत्साह दिसून आला. बोरिस जॉन्सन सरकारमध्ये अर्थमंत्री असलेले ऋषी सुनक हे ब्रिटनचे पुढील पंतप्रधान असतील. या बातमीने मुहूर्ताच्या वेळी बाजारात उत्साह दिसून आला.

ऋषी सुनक हे पुढील पंतप्रधान असतील हे निश्चित असल्यामुळे यूकेच्या मुख्य इक्विटी निर्देशांकांनी आज उच्चांक गाठला त्यामुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला.

हेही वाचा: Muhurat Trading : आज 'हे' पाच स्टॉक खरेदी केल्यास मिळू शकतात दुप्पट रिटर्न

भारतात आज दिवाळी शुभ मुहूर्ताच्या व्यवहारात ज्या क्षेत्रांमध्ये सर्वात मोठी तेजी दिसून येत आहे ती म्हणजे बँकक्षेत्र.  या क्षेत्रात एक ते दीड टक्क्यांची तेजी दिसत आहे. वित्तीय सेवा क्षेत्रातही 1.26 टक्क्यांनी वाढ होत आहे.

 आज तेजीत असलेल्या बँकिंग खेत्रातील स्टॉकची नावे :

ICICI बँक, HDFC बँक, SBI, Axis Bank, बजाज फायनान्स, इंडसइंड बँक यांनी चांगली उसळी घेतली आहे.

हेही वाचा: Muhurat Trading : दिवाळीच्या शुभमुहूर्तावर शेअर बाजाराची ऐतिहासिक कामगिरी; वाचा सविस्तर

बँक निफ्टीत मोठी तेजी :

आज बँक निफ्टीच्या शेअर्समध्ये झालेल्या जोरदार वाढीमुळे तो 41,000 च्या वर गेला आहे आणि तो 508 अंकांच्या मजबूत स्थितीत आहे.

या निफ्टी समभागांमध्ये वाढ :

L&T, HDFC, Tata Consumers, HDFC बँक आणि ICICI बँक. आज NSE निफ्टीच्या सर्वात जास्त तेजीत आहे.