Muhurat Trading : दिवाळीच्या शुभमुहूर्तावर शेअर बाजाराची ऐतिहासिक कामगिरी; वाचा सविस्तर

देशातील प्रमुख स्टॉक एक्स्चेंज BSE आणि NSE आज एक तासाचे विशेष मुहूर्त ट्रेडिंग सत्र सुरू होते.
BSE
BSEsakal

देशातील प्रमुख स्टॉक एक्स्चेंज BSE आणि NSE आज एक तासाचे विशेष मुहूर्त ट्रेडिंग सत्र सुरू होते. मुहूर्त ट्रेडिंगची वेळ या वर्षी संध्याकाळी 6.15 ते 7.15 पर्यंत एक तास होती. ब्लॉक डील संध्याकाळी 5.45 ते 6 वाजेपर्यंत होती. मुहूर्त ट्रेडिंग हे प्री ओपन ट्रेडिंग सत्र संध्याकाळी 6:00 ते 6:08 पर्यंत होते. मुहूर्ताच्या वेळी बाजारामध्ये ऐतिहासिकदृष्ट्या चांगली कामगिरी झाली आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर शेअर बाजाराने चांगलीच सुरुवात केली होती. NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 200.20 अंकांनी 1.14 टक्क्यांच्या उसळीसह 17776.50 वर उघडला. त्याच वेळी, बीएसई सेन्सेक्स 659.40 अंकांनी 1.11 टक्क्यांच्या उसळीसह 59,966 वर उघडण्यात यशस्वी झाला आहे.

बाजार बंद होताना निफ्टी 147 अंकांच्या वाढीसह 17,723 वर आहे आणि सेन्सेक्स 532 अंकांनी वाढून 59,839 च्या पातळीवर आहे.

BSE
Muhurat Trading : आज 'हे' पाच स्टॉक खरेदी केल्यास मिळू शकतात दुप्पट रिटर्न

मुहूर्त ट्रेडिंग प्री-ओपन : निफ्टी देखील 179 अंकांनी वधारला

शेअर बाजाराच्या प्री-ओपनिंगमध्ये, NSE चा निफ्टी 179 अंकांच्या किंवा 1.02 टक्क्यांच्या उसळीसह 17755 च्या पातळीवर होता.

मुहूर्त ट्रेडिंग प्री-ओपनिंग :

 दिवाळी मुहूर्ताची वेळ संध्याकाळी 6 ते 6.08 पर्यंत असते आणि या काळात शेअर बाजारात तेजी असते. BSE चा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 418 अंकांच्या किंवा 0.71 टक्क्यांच्या वाढीसह 59725 च्या पातळीवर होता.

आजच्या वाढलेल्या स्टॉकची नावे :

सेन्सेक्समध्ये नेस्ले, ICICI बँक, L&T, HDFC, HDFC बँक, SBI, Tata Steel, Bajaj Finserv, NTPC, Infosys, PowerGrid, M&M, NTPC, Axis Bank, Dr Reddy's Laboratories, Asian Paints, Bharti Airtel, ITC, Titan. इंडस्ट्रीज, टीसीएस, सन फार्मा, एचसीएल टेक, विप्रो, टेक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स, इंडसइंड बँक चांगली उसळी घेत आहेत.

BSE
‘या’ सरकारी योजनेत गुंतवणुक केल्यास मिळू शकतात दुप्पट रिटर्न

या निफ्टी समभागांमध्ये झाली वाढ :

L&T, HDFC, Tata Consumers, HDFC बँक आणि ICICI बँक आज NSE निफ्टीच्या सर्वात मोठ्या वाढीमध्ये उडी पाहत आहेत.

२०२१ च्या मुहूर्त ट्रेडिंगला असं होतं मार्केट :

गेल्या वर्षी 4 नोव्हेंबर 2011रोजी मुहूर्त ट्रेडिंगचे आयोजन करण्यात आले होते. एका तासाच्या या सत्रात बीएसई सेन्सेक्स 60 हजारांच्या वर पोहोचला होता. मुहूर्तावर सेन्सेक्स 60,067 अंकांच्या पातळीवर तर निफ्टी 17,921अंकांच्या पातळीवर बंद झाला. 2022 मध्ये शेअर बाजारात बरीच उलथापालथ झाली असली तरी, मुहूर्त ट्रेडिंगदरम्यान सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जोरदार वाढ होण्याची अपेक्षा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com