‘डीएलएफ’च्या शेअरमध्ये घसरण का?

वृत्तसंस्था
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली: कमकुवत तिमाही निकाल तसेच उपकंपनीतील हिस्साविक्री योजना लांबणीवर पडल्याने डीएलएफच्या शेअरमध्ये आज(बुधवार) सुमारे साडेसहा टक्क्यांची घसरण झाली आहे.

डिसेंबरअखेर संपलेल्या कंपनीचा नफा 46 टक्क्यांनी घसरुन 98.1 कोटी रुपयांवर पोचले आहे. त्याचप्रमाणे, कंपनीला या काळात 2,058 कोटी रुपयांचे एकुण उत्पन्न मिळाले आहे. नोटाबंदीचा विक्रीवर किरकोळ आणि तात्पुरता परिणाम झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. डीएलएफचे कार्यान्वयन उत्पन्न 30 टक्क्यांनी घसरुन 2,057.92 कोटी रुपयांवर पोचले आहे.

डीएलएफची उपकंपनीतील हिस्साविक्री पुढीलवर्षी(2018) मार्चमध्ये केली जाणार आहे. कर्जाचा बोजा वाढत चालल्याने कंपनीच्या वाढीस अडथळा निर्माण होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यासाठी कंपनी डीएलएफ सायबर सिटी डेव्हलपर्समधील 40 टक्के हिस्सेदारीची विक्री करण्याची योजना करीत आहे. यातून कंपनीला सुमारे 12,000 ते 14,000 कोटी रुपयांची रक्कम मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कंपनीवर सुमारे 20,000 कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा आहे.

मुंबई शेअर बाजारात डीएलएफचा शेअर आज(बुधवार) 143.10 रुपयांवर उघडला. त्यानंतर, शेअरने 137.75 रुपयांवर दिवसभराची नीचांकी तर 143.75 रुपयांवर दिवसभराची उच्चांकी पातळी गाठली. सध्या(1 वाजून 12 मिनिटे) कंपनीचा शेअर 139.15 रुपयांवर व्यवहार करत असून 5.66 टक्क्यांनी घसरला आहे.

Web Title: DLF share down?