
गुंतवणूकीची सुवर्णसंधी सोडू नका, ऐका तज्ज्ञांचा सल्ला...
शेअर बाजार सध्या प्रचंड अस्थिरतेतून जात आहे. अशा वेळी तुम्हाला पैसे गुंतवण्याची नामी संधी आहे. कारण ज्यावेळी शेअर मार्केटमध्ये पडझड होते, चांगले शेअर्स तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये मिळू शकतात, कारण येत्या काळात मार्केटमध्ये तेजी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पैसे गुंतवणे तुम्हाला फायद्याचे ठरेल असा विश्वास शेअर मार्केट एक्सपर्ट व्यक्त करत आहेत. आयआयएफएल सिक्युरिटीजचे संचालक संजीव भसीन यांनी तुमच्यासाठी 3 शेअर्सची लिस्ट आणली आहे. या शेअर्समध्ये गुंतवणूक करुन तुम्ही चांगला नफा कमवू शकता.
तर आज संजीव भसीन यांनी बजाज फायनान्स ( Bajaj Finance), महिन्द्रा अँड महिन्द्रा फायनान्स (M&M Finance) आणि टाटा केमिकल्ससारख्या (Tata Chemical ) शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
हेही वाचा: Delhivery IPO आजपासून गुंतवणूकीसाठी खुला, सब्सक्रिप्शन घ्यायचे का? एक्सपर्ट काय सांगतात पाहूयात
1. बजाज फायनान्स ( Bajaj Finance)
सीएमपी (CMP) - 6015.05 रुपये
टारगेट (Target) - 6300/6350 रुपये
स्टॉप लॉस (Stop Loss) - 5900 रुपये
2. महिन्द्रा अँड महिन्द्रा फायनान्स (M&M Finance)
सीएमपी (CMP) - 174.75 रुपये
टारगेट (Target) -185 रुपये
स्टॉप लॉस (Stop Loss) - 170 रुपये
3. टाटा केमिकल (Tata Chemical)
सीएमपी (CMP) - 1009.00 रुपये
टारगेट (Target) -1055/1065 रुपये
स्टॉप लॉस (Stop Loss) - 980 रुपये
हेही वाचा: 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा शेअर देईल 70 % परतावा
काही काळापुर्वी संजीव भसीन यांनी मदरसन सुमी ( Motherson Sumi), एल अँड टी (L&T), डीएलएफमध्ये (DLF) पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला होता. जो सल्ला अनेकांना फायदेशीर ठरला कारण डीएलएफने चांगला परतावा दिला आहे. तर L&T चे निकाल 12 मे रोजी येणार आहेत, जे इंजीनिइरिंग, पॉवर आणि कंस्ट्रक्शनच्या बाबतीत चांगला परतावा देऊ शकतात.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
Web Title: Do You Want To Invest In Share Market Lets Check Here
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..