Delhivery IPO आजपासून गुंतवणूकीसाठी खुला, सब्सक्रिप्शन घ्यायचे का? एक्सपर्ट काय सांगतात पाहूयात |IPO Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Delhivery IPO

Delhivery IPO आजपासून गुंतवणूकीसाठी खुला, सब्सक्रिप्शन घ्यायचे का? एक्सपर्ट काय सांगतात पाहूयात

सप्लाय चेन कंपनी दिल्लीव्हेरीचा (Delhivery) IPO आजपासून सुरू झाला असून यात 13 मे पर्यंत पैसे गुंतवले जाऊ शकतात. या IPO द्वारे कंपनीने शेअरची किंमत 462-487 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. कंपनी या IPO द्वारे 5,235 कोटी रुपये उभारण्याचा विचार करत आहे. तुम्हालाही या IPO मध्ये पैसे गुंतवायचे असतील तर आधी एक्सपर्ट काय सांगत आहेत जाणून घेऊयात.

हेही वाचा: शेअर बाजार सुरू होण्यापूर्वी एक नजर टाका आज परफॉर्म करणाऱ्या 10 शेअर्सवर

आजपासून IPO खुला, गुंतवणूकदारांनी काय करावे ?

मार्केट एक्सपर्ट अनिल सिंघवी यांनी गुंतवणूकदारांना या IPO पासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. या IPO मध्ये पैसे गुंतवावे किंवा न गुंतवावेत यासाठी कंपनीचे पॉझिटीव्ह आणि नेगिटीव्ह पॉईंट्स दिले आहेत.

पॉझिटीव्ह पॉईंट

कंपनीचा आऊटलूक चांगला असल्याचे अनिल सिंघवी म्हणाले. शिवाय आयपीओनंतरही कंपनीजवळ 6500 कोटींची रोकड आहे.

नेगिटीव्ह पॉईंट

ही कंपनी तोट्यात चालणारी कंपनी असल्याचे अनिल सिंघवी म्हणाले. कंपनीचे मूल्यांकन महाग आहे शिवाय नेगिटीव्ह कॅश फ्लो असल्याने त्यांनी गुंतवणूकदारांना पैसे न गुंतवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हेही वाचा: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण

या IPO ची किंमत 462-487 रुपयांच्या दरम्यान निश्चित करण्यात आली आहे. त्याची लॉट साइज 30 शेअर्स ठेवण्यात आली असून येथे गुंतवणूकदारांना किमान 14 हजार 610 रुपये गुंतवावे लागतील. या सार्वजनिक इश्यूमध्ये 4,000 कोटी किमतीचे इक्विटी शेअर्स जारी केले जातील आणि विद्यमान भागधारकांद्वारे 1,235 कोटी रूपये विक्रीसाठी (OFS) ऑफर केले जातील.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Web Title: As Delhivery Ipo Opens Today Do You Want To Invest In It

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top