नववर्षात आर्थिक नियोजनाची ‘लिटमस टेस्ट’

५० हजार रुपये प्रति महिना एवढे एकूण उत्पन्न असणाऱ्या कुटुंबाचा दैनंदिन आणि अत्यावश्यक गरजा यावर साधारण २५ हजार रुपये एवढा खर्च व्हावा
Financial plan
Financial plansakal

वर्षाच्या सुरुवातीलाच आपण आपल्या आर्थिक नियोजनाची ‘लिटमस टेस्ट’ करून घेऊ या. आपण आपले आर्थिक नियोजन योग्य दिशेने करतो आहोत, की नाही याची ‘लिटमस टेस्ट’ करण्यासाठी ५०:३०:२० हा नियम वापरता येतो.

हा नियम असे सांगतो, की तुमच्या एकूण उत्पन्नाच्या ५० टक्के खर्च हा तुमच्या दैनंदिन आणि अत्यावश्यक गरजांवर व्हायला हवा, ३० टक्के खर्च हा मनोरंजन, हौसमौज अशा इच्छांवर व्हायला हवा आणि उर्वरित २० टक्के रकमेची बचत आणि गुंतवणूक व्हायला हवी.

वर्षाच्या सुरुवातीलाच ही ‘लिटमस टेस्ट’ आपली आपणच करून घ्यावी आणि त्याप्रमाणे आपल्या आर्थिक नियोजनात आवश्यक त्या सुधारणा कराव्यात. उदाहरणार्थ, ५० हजार रुपये प्रति महिना एवढे एकूण उत्पन्न असणाऱ्या कुटुंबाचा दैनंदिन

आणि अत्यावश्यक गरजा यावर साधारण २५ हजार रुपये एवढा खर्च व्हावा, मनोरंजन आणि हौसमौज यावर साधारण १५ हजार रुपये खर्च व्हावा, तर कमीकमी १० हजार रुपयांची बचत आणि गुंतवणूक व्हावी, असे हा नियम सांगतो.

नियम छोटा; फायदे मोठे

वरवर पाहता हा नियम सोपा आणि छोटा वाटत असला, तरी त्याचे फायदे अनेक आहेत. हा नियम आपल्याला आर्थिक नियोजनात अनेक प्रकारे मार्गदर्शक ठरू शकतो. उदाहरणार्थ, ज्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजा आणि अत्यावश्यक खर्च यावर उत्पन्नाच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक खर्च होत आहे,

अशा कुटुंबातील व्यक्तींनी उत्पन्नाचे नवे स्रोत शोधून उत्पन्न वाढवलेच पाहिजे. कारण दैनंदिन गरजा आणि अत्यावश्यक खर्च कमी करणे शक्य नसते. जगण्यासाठी ते आवश्यकच असतात. असे खर्चच उत्पन्नाच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक असतील आणि नजीकच्या काळात उत्पन्न वाढण्याची शक्यता नसेल, तर वाढत्या महागाईच्या रेट्यात काही दिवसांनी या खर्चानी ही टक्केवारी अशीच वाढू शकते. त्यामुळे उत्पन्न वाढविणे हा एकच पर्याय उरतो.

यानंतरचा मुद्दा येतो तो मनोरंजन आणि हौसमौज यावरील खर्च! यांचे प्रमाण उत्पन्नाच्या ३० टक्क्यांपेक्षा अधिक असेल, तर अशा खर्चांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. या ठिकाणी गरज आणि इच्छा यातील फरकसुद्धा समजावून घेतला पाहिजे.

उदाहरणार्थ, आयुर्विमा आणि आरोग्य विमा याचा हप्ता ही सध्याच्या काळातील गरज आहे, तर हॉटेल आणि फिरणे यावरील खर्च हा इच्छा या सदरात मोडतो. याबरोबरच अत्यावश्यक खर्च आणि गुंतवणूक यातील फरकदेखील समजून घेतला पाहिजे.

आपल्या राहत्या घराच्या कर्जाचा हप्ता ही गुंतवणूक नसून, अत्यावश्यक खर्च आहे; मात्र आपण गुंतवणुकीसाठी घेतलेल्या दुसऱ्या घराच्या कर्जाचा हप्ता ही गुंतवणूक आहे. अनेकदा गरज, इच्छा आणि गुंतवणूक यातील फरक समजून न घेतल्यामुळे आर्थिक नियोजनात गडबड होते.

आपल्या अत्यावश्यक गरजा, मनोरंजन आणि हौसमौज यावर होणाऱ्या खर्चांवर लक्ष ठेवले, की या निमानुसार अपेक्षित असलेली कमीकमी २० टक्क्यांची बचत आणि गुंतवणूक आपोआप होऊ शकते. हा नियम तंतोतंतपणे पाळणे शक्य नसले, तरी आणि या नियमाला अपवाद असले, तरी आपल्या आर्थिक नियोजनाची ‘लिटमस टेस्ट’ करण्यासाठी या नियमाचा उपयोग होऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com