टाटाला मागे टाकणारी Dream 11 कंपनी आहे तरी काय?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 18 August 2020

IPL 2020 च्या टायटल स्पॉन्सरशिपचे हक्क Dream 11 ने जिंकले. यामुळे टाटा उद्योग समुह आणि बायजू यांचे स्वप्न भंगले. Dream 11 ने 222 कोटी रुपये मोजून यंदाच्या आयपीएल हंगामाचे हक्क खरेदी केली. 

नवी दिल्ली - IPL 2020 च्या टायटल स्पॉन्सरशिपचे हक्क Dream 11 ने जिंकले. यामुळे टाटा उद्योग समुह आणि बायजू यांचे स्वप्न भंगले. Dream 11 ने 222 कोटी रुपये मोजून यंदाच्या आयपीएल हंगामाचे हक्क खरेदी केली. ड्रीम 11 हा स्पोर्ट्स टेक्नॉलॉजी कंपनी असलेल्या ड्रीम स्पोर्ट्सचा एक ब्रँड आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये याशिवाय FanCode, DreamX, DreamSetGo आणि DreamPay अशीही नावे आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की, खेळाच्या चाहत्यांना अनेक प्रकारच्या संधी द्यायच्या आहेत. चाहते त्यांच्या आवडत्या खेळाशी नेहमीच कनेक्ट रहावेत हा कंपनीचा उद्देश आहे. कंपनीने त्यांचे ध्येयसुद्धा 'Make Sports Better' असं असल्याचं म्हटलं आहे. 

2008 मध्ये कंपनीची स्थापना
ड्रीम स्पोर्ट्सची स्थापना 2008 मध्ये झाली होती. ड्रीम 11 च्या वेबसाइटनुसार कंपनीचे सीईओ आणि सह संस्थापक हर्षित शाह आहेत. तर भावित सेठ हे सीओओ आहे. चीफ मार्केटिंग ऑफिसर विक्रांत मुदलियर आणि चीफ इन्फर्मेशन ऑफिसर अभिषेक रवि आहेत. अमित शर्मा हे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर आहेत. 

हर्षा भोगले यांना केलं ब्रँड अँबेसिडर
2012 मध्ये कंपनीने Freemium Fantasy Cricket लाँच केलं होतं. त्याचे युजर्स 2014 मध्ये एक लाखांवर पोहोचले. त्यानंतर 2015 मध्ये सिरिज ए फंडिंग केलं. 2016 मध्ये कंपनीने युजर्सच्या संख्येत मोठी झेप घेत 13 लाखांचा आकडा गाठला. तीन वर्षांपूर्वी 2017 मध्ये कंपनीने सीरीज सी फंडिंग केलं आणि क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांना ब्रँड अम्बेसिडर केलं आहे. त्यानंतर 2018 मध्ये कंपनीच्या युजर्सची संख्या 1.7 कोटी इतकी झाली होती. 

हे वाचा - IPL 2020 चे टायटल स्पॉन्सर आता Dream 11; टाटा, बायजूला मागे टाकून मारली बाजी

धोनी नाव ब्रँड अँबेसिडर
ड्रीम स्पोर्ट्सने आयसीसी, पीकेएल, एफआयएच आणि बीबीएलसोबत करार केला. त्याच वर्षी कंपनीने महेंद्र सिंह धोनीला त्यांचा नवा ब्रँड अँबेसिडर केला. तसंच पहिल्यांदा फँटसी हॉकी लाँच करण्यात आलं. 2019 मध्ये याची संख्या 7 कोटींवर पोहोचली होती. याशिवाय कंपनीने आयपीएल आणि आयसीसीसोबतही करार केले. या वर्षी कंपनीने पहिल्यांदा फँटसी व्हॉलीबॉल लाँच केलं. तसंच 20 हून अधिक सेलिब्रिटी क्रिकेटपटूंसोबत करार केला आहे. 

Edited By - Suraj Yadav


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dream 11 company win ipl 2020 title sponsership