डीएसकेंनी न्यायालयाची फसवणूक केली: उच्च न्यायालय 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

डीएकेंनी मुंबई उच्च न्यायलयाची फसवणूक केल्याचे सिद्ध आहे. याची उच्च न्यायालयाने दखल घेत आता संताप व्यक्त केला असून त्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. त्यांना यापुढे एकही संधी देण्याची इच्छा नाही, अशा शब्दात उच्च न्यायालयाने डीएसकेंना फटकारले. 

मुंबई : डी. एस. कुलकर्णी (डीएके) यांच्या समोरील अडचणीत वाढ झाली आहे.  मुंबई उच्च न्यायालयाकडून दोनदा दिलासा मिळाल्यांनतर डीएकेंनी मुंबई उच्च न्यायलयाची फसवणूक केल्याचे सिद्ध आहे. याची उच्च न्यायालयाने दखल घेत आता संताप व्यक्त केला असून त्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. त्यांना यापुढे एकही संधी देण्याची इच्छा नाही, अशा शब्दात उच्च न्यायालयाने डीएसकेंना फटकारले. 

 डीएसकेंबाबत अंतिम निर्णय 22 फेब्रुवारीला घेतला जाणार आहे. मात्र उच्च न्यायलयाची फसवणूक केल्याने  डीएसकेंचा पासपोर्ट जप्त करण्याचे आदेश दिले आहे. डीएसकेंचे पासपोर्ट तातडीनं जप्त करण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने दिल्यानंतर  डीएसकेंनी आपला पासपोर्ट तपास यंत्रणांकडे जमा केल्याची माहिती न्यायालयला दिली. त्यावर, कशावरुन डीएसकेंकडे एकच पासपोर्ट असेल? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला.

या दरम्यान न्यायालयाने  बुलडाणा अर्बन कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटीला देखील समज देत तुम्ही डीएसकें कागदपत्रांची पूर्ण छाननी न करताच तुम्ही कर्ज द्यायला कसे तयार झालात? तुमच्याकडे लोकांचाच पैसा आहे, हे लक्षात ठेवा असेही न्यायालयाने बजावले. 12 कोटींचा डीडी डीएसकेंना कोणत्या आधारे दिला होता, असा सवालही उपस्थित केला.गुंतवणूकदारांचा न्यायालयावरील  विश्वास उडत चालला आहे. देशात दररोज 10 -12 हजार कोटींचे नवनवीन गैरव्यवहार उघड होत आहेत. 

Web Title: DSK anticipatory bail Bombay High Court