ई-व्हिसावरील पर्यटकांना मोफत सिम कार्ड

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली : भारतात ई-व्हिसावर येणाऱ्या पर्यटकांना सरकारकडून विमानळावरच मोफत बीएसएनएलचे सिमकार्ड दिले जाणार आहे. या कार्डवर 50 रुपयांच्या टॉकटाईमसह 50 एमबी डेटीही फुकट मिळणार आहे.

नवी दिल्ली : भारतात ई-व्हिसावर येणाऱ्या पर्यटकांना सरकारकडून विमानळावरच मोफत बीएसएनएलचे सिमकार्ड दिले जाणार आहे. या कार्डवर 50 रुपयांच्या टॉकटाईमसह 50 एमबी डेटीही फुकट मिळणार आहे.

या योजनेची सुरवात केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री महेश शर्मा यांच्या हस्ते झाली. या वेळी बोलताना शर्मा म्हणाले, ""भारतात पोचल्यानंतर विदेशी पर्यटकांना त्यांच्या जवळच्या व्यक्तींशी संपर्क साधणे सोपे जावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. ई-व्हिसाची प्रत विमानतळावर स्वीकारतानाच बीएसएनएलचे सिमकार्ड पर्यटकांना देण्यात येणार आहे. ही सुविधा केवळ ई-व्हिसावर भारतात येणाऱ्या पर्यटकांसाठी आहे. सध्या ही सुविधा दिल्ली विमानतळावर सुरू करण्यात आली असून, लवकरच ती अन्य विमानळांवर सुरु करण्यात येणार आहे.''

या सिमकार्डमध्ये 50 रुपये टॉकटाईम आणि 50 एमबी डेटा असणार आहे. हे सिम कार्ड लगेचच सुरू होणार आहे. यामुळे पर्यटकांना त्याचा वापर लगेच सुरू करता येईल. पर्यटकांना भारतात आगमन झाल्यानंतर त्यांच्या जवळच्या व्यक्तींशी संपर्क साधणे सुकर व्हावे, हा या योजनेचा उद्देश आहे. तसेच, पर्यटन मंत्रालयाच्या 1800111363 या हेल्पलाईनवरही पर्यटकांना त्यांच्या भाषेत हवी ती माहिती मिळविता येणार आहे.

Web Title: e visa tourists get free sim card