चीनसह पूर्व आशियातील देशांच्या अर्थव्यवस्थेला कोरोनाचा संसर्ग

world bank on east asia
world bank on east asia

टोकियो: जगभरात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. चीनमधून सुरु झालेल्या या कोरोनाच्या साथीने आज जगाला कवेत घेतले आहे. पण चीन मात्र देशातील परिस्थिती पूर्वपदावर आल्याचे दाखवत आहे. दुसऱ्याबाजूला पूर्व आशिया आणि पॅसिफिक क्षेत्रातील देशांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असल्याची माहिती जागतिक बँकेने दिली आहे. कोरोनाच्या संकटामुळे पूर्व आशिया आणि पॅसिफिक तसेच चीनमध्ये गेल्या 50 वर्षांतील सर्वात मंद आर्थिक वाढ होण्याची शक्यता आहे, असे एका आर्थिक अहवालात जागतिक बँकेने सोमवारी म्हटले आहे.

कोरोना महामारीने सर्व देशांची अर्थव्यवस्था ढासळली आहे. पूर्व आशियातील देशांसह पॅसिफिक तसेच चीनमध्ये 1967 नंतरची सर्वात मंद आर्थिक वाढ होईल. तसेच या काळात 3.8 कोटी लोक गरिबीच्या खाईत ढकलली गेलेली असतील. या भागातील आर्थिक वाढ फक्त 0.9 टक्के (1967 नंतरचा सर्वात कमी दर) राहील. पूर्व आशिया आणि पॅसिफिक क्षेत्रातील देशांची अर्थव्यवस्था साडेतीन टक्क्यांनी आकुंचन पावेल असा अंदाजही जागतिक बँकेच्या (World Bank) अहवालात आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशांना मोठा खर्च करावा लागला. तसेच या काळात इथले उद्योगधंदेही मोठ्या प्रमाणात रोडावले होते. यामुळे या देशांचा आर्थिक विकास पूर्णपणे थांबला. जागतिक मंदीमुळे या देशांमध्ये अडचणी वाढल्या. व्यापार, व्यवहार, लहानमोठे व्यवसाय या काळात बंद होते. बंद असलेला व्यापार आणि पर्यटनावर अवलंबून असलेल्या पूर्व आशिया आणि पॅसिफिक (East Asia and the Pacific as well as China) देशांच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका  बसल्याचे जागतिक बॅंकेने सांगितले आहे. 

 पूर्व आशियाई देशांना कोरोनामुळे पडलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी आर्थिक सुधारणा करून महसूल वाढवण्यावर लक्ष दिले पाहिजे. तसेच विविध सामाजिक संरक्षण कार्यक्रम (social protection programmes) कामगारांमध्ये आत्मविश्वास वाढवला पाहिजे, असेही जागतिक बँकेने अहवालात म्हटले आहे. 

सध्या जगभरातील कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 10 लाखांच्या वर गेली आहे. 2019 मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण चीनच्या वुहान शहरात आढळला होता. त्यानंतर कोरोनाची व्याप्ती जगभरात वाढतच गेली. एकापाठोपाठ जगभरातील देशांनी लॉकडाऊन जाहीर केले होते. सुरुवातीला युरोपातील जर्मनी, स्पेन, ब्रिटन आणि इतर देशांत कोरोनाचा कहर दिसून आला होता. आता दुसऱ्या टप्प्यात भारतासह अमेरिका आणि ब्राझीलला कोरोनाचा फटका बसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com