विकासदर मंदावला असला, तरी अर्थव्यवस्थेत मंदी नाही : निर्मला सीतारामन 

विकासदर मंदावला असला, तरी अर्थव्यवस्थेत मंदी नाही : निर्मला सीतारामन 

नवी दिल्ली, ता. 18 (वृत्तसंस्था) : विकासदर जरी घटला असला तरी जी-20 देशांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था ही सर्वाधिक वेगाने वृद्धींगत होणारी अर्थव्यवस्था आहे. अर्थव्यवस्थेला फाईव्ह ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट 2025 पर्यंत साध्य होईल, असा विश्‍वास अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे. केरळचे खासदार एन.के प्रेमचंद्रन यांनी विचारलेल्या प्रश्नाला सितारामन यांनी सोमवारी (ता.18) संसदेत उत्तर दिले आहे. 

विकासदरात घट झाली असतानाही वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलूकच्या दाखल्याने "जी-20" देशांमध्ये 2019-20 या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था सर्वाधिक वेगाने विस्तारणारी अर्थव्यवस्था असल्याचे सीतारामन यांनी म्हटले आहे. सरकार गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी अनेक पावले उचलत आहे. देशातंर्गत बाजारपेठेतील मागणीला चालना देणे, योग्य निर्यातदर राखून विकासदर वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करणे सुरू असल्याचे ही सीतारामन यांनी सांगितले. उत्पादनातील नव्या कंपन्यांसाठी सप्टेंबर महिन्यात जाहीर करण्यात आलेला 15 टक्के कॉर्पोरेट कर हा जगातील सर्वात कमी कर असल्याचा दावा सीतारामन यांनी केला. गुंतवणूक आकर्षित करण्यासंदर्भात स्थैर्य निर्माण करण्यासाठी आर्थिक सुधारणा करत असतानाच सरकारने महागाई दर आटोक्‍यात ठेवला आहे. त्याचबरोबर महसूली खर्चात शिस्त आणली आहे आणि चालू खात्याची वित्तीय तूटसुद्धा आटोक्‍यात ठेवली आहे, असे सीतारामन यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे. 

अर्थराज्यमंत्र्यांकडून नोटाबंदीचे समर्थन 

आम आदमी पक्षाचे खासदार भगवंतसिंग मान यांच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरील प्रश्नाला उत्तर देताना अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी 2016 मध्ये झालेल्या नोटबंदीचे समर्थन करून हा निर्णय देशाच्या विकासात मैलाचा दगड असल्याचे म्हटले आहे. पाच टक्के विकासदर म्हणजे मंदी नव्हे. देशाची अर्थव्यवस्था फाईव्ह ट्रिलियन डॉलरवर नेण्याचे उद्दिष्ट 2025 पर्यत गाठले जाईल, असेही ठाकूर पुढे म्हणाले. 

web title : The economy is not slowing even though growth is slow: Nirmala Sitharaman

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com