ईडीने मेहुलचोक्सी भोवती फास आवळला; 151 कोटींची संपत्ती जप्त 

ईडीने मेहुलचोक्सी भोवती फास आवळला; 151 कोटींची संपत्ती जप्त 

नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) तेरा हजार कोटी रुपायांचा गैरव्यवहारातील आरोपी मेहुल चोक्सी भोवती अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) मेहुल फास आवळला आहे. ईडीकडून चोक्सीची 151.7 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. पीएनबी गैरव्यवहारात चोक्सी सहआरोपी असल्याने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यानुसार ('प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट,2002') ईडीने ही कारवाई केली आहे 

ईडीकडून करण्यात आलेल्या या आधीच्या कारवाईत लंडनमधील तुरूंगात असलेला आरोपी नीरव मोदीकडे असलेल्या दुर्मिळ छायाचित्रांचा लिलाव करण्यात आला होता.तसेच नीरव आणि मेहुल चोक्सी याच्या 13 आलिशान गाड्यांचा लिलाव करण्यात आला होता. अंमलबजावणी संचलनालयाने मेहुल चोक्सीच्या 2 तर नीरव मोदीच्या 11 गाड्या जप्त केल्या होत्या. तसेच 100 कोटींहुन अधिक मूल्याचे शेअर आणि ठेवी गोठवण्यात आल्या होत्या. दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच  19 मार्चला नीरव मोदीला लंडनमध्ये अटक करण्यात आली होती.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com