ED प्रमुखांना 2 वर्षांचा स्थिर कार्यकाळ

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

हा कार्यकाळ 27 ऑक्‍टोबर 2016 पासून गृहीत धरण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : सक्त वसुली संचलनालयाचे (ईडी) प्रमुख कर्नालसिंग यांना दोन वर्षांचा स्थिर कार्यकाळ केंद्र सरकारने मंगळवारी जाहीर केला. सिंग यांना कार्यकाळ देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे.

कर्नालसिंग हे भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) 1984 च्या बॅचचे अधिकारी आहेत. गेल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये सिंग यांची "ईडी'च्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. ते या वर्षी ऑगस्ट महिन्यात निवृत्त होत आहेत.

आता मंत्रिमंडळाच्या निवड समितीने त्यांना दोन वर्षांचा स्थिर कार्यकाळ देण्यास मंजुरी दिली आहे. हा कार्यकाळ 27 ऑक्‍टोबर 2016 पासून गृहीत धरण्यात येणार आहे. केंद्रीय दक्षता आयोग कायद्यातील तरतुदीनुसार सिंग यांना किमान दोन वर्षांचा कार्यकाळ देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच केंद्र सरकारला दिले होते.

Web Title: ED chief karnail singh given stable regime