चिदंबरम म्हणाले 'ईडी को कुछ नहीं मिला'

वृत्तसंस्था
शनिवार, 13 जानेवारी 2018

''ईडीने केलेल्या ईडी छापेमारीत त्यांना काहीही मिळालेले नाही. मी स्वत: छापेमारीच्या वेळी त्याठिकाणी उपस्थित होतो. 

नवी दिल्ली : सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) शनिवारी माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्या दिल्ली आणि चेन्नई येथील ठिकाणच्या मालमत्तांवर छापेमारीची कारवाई केली. ईडीकडून छापेमारी केल्यानंतर पी. चिदंबरम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, ''ईडीने केलेल्या ईडी छापेमारीत त्यांना काहीही मिळालेले नाही. मी स्वत: छापेमारीच्या वेळी त्याठिकाणी उपस्थित होतो. 

एअरसेल-मॅक्सिस खटल्यातील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीकडून ही छापेमारीची कारवाई करण्यात आली आहे. केंद्रीय तपास संस्थेने गेल्यावर्षी 1 डिसेंबर रोजी कार्ती चिदंबरम यांच्या मालकीशी संबंधित मालमत्तांवर छापेमारीची कारवाई केली होती. त्यानंतर आता ही कारवाई करण्यात येत आहे. कार्ती चिदंबरम यांना आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाकडून समन्स बजावण्यात येणार होेते. कार्ती चिदंबरम यांच्याशी संबंधित आयएनएक्‍स मीडिया फर्ममधील परकी गुंतवणुकीस मान्यता देताना झुकते माप दिल्याचा आरोप आहे.

दरम्यान, पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या आयएनएक्‍स मीडिया या कंपनीला नियमापेक्षा अधिक परदेशी गुंतवणूक मिळवून दिल्याचा आरोप कार्ती यांच्यावर आहे.

Web Title: ED raids Karti Chidambaram’s premises