डाबरच्या संचालकाची मालमत्ता जप्त

पीटीआय
बुधवार, 23 मे 2018

नवी दिल्ली - डाबर समूहाचे संचालक प्रदीप बर्मन यांची २०.८७ कोटी रुपयांची मालमत्ता सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. 

नवी दिल्ली - डाबर समूहाचे संचालक प्रदीप बर्मन यांची २०.८७ कोटी रुपयांची मालमत्ता सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. 

‘एचएसबीसी’ बॅंकेतील काळापैसाधारक भारतीय खातेदारांची यादी २००७ मध्ये उघड झाली होती. यादीतील भारतीयांच्या काळ्या पैशाचा तपास ‘ईडी’ करीत आहे. ‘हुडको’ आणि ‘आयआरएफसी’मधील बर्मन यांचे ५० हजार रुपयांचे सरकारी रोखेही जप्त करण्यात आले आहेत. बर्मन यांनी एचएसबीसी बॅंकेतील झुरीच येथील खात्यात ३२.१२ लाख रुपये टाकले होते. त्यांनी ही रक्कम  २००७-०८च्या प्राप्तिकर विवरणपत्रात दाखविलेली नव्हती. डाबर इंडिया लिमिटेड, सनत प्रॉडक्‍ट लिमिटेड अँड आयुर्वेद, रत्ना कमर्शियल एंटरप्रायजेस या कंपन्यांचे बर्मन हे संचालक असून, बर्मन कुटुंबीयांच्या डॉ. एस. के. बर्मन चॅरिटेबल ट्रस्टचे ते विश्‍वस्त आहे.

‘एचएसबीसी’च्या यादीचा तपास  
‘एचएसबीसी’ बॅंकेच्या जिनिव्हा शाखेत काळा पैसा ठेवणाऱ्या भारतीयांची यादी फ्रान्स सरकारने भारताला २००७ मध्ये दिली होती. या यादीत ६२८ भारतीयांचा समावेश आहे. या प्रकरणी प्राप्तिकर विभागाने आरोपपत्र दाखल केल्यानंतर याचा तपास ‘ईडी’ करीत आहे.

Web Title: ED seizes assets of Dabur India director