
देशातील प्रमुख आठ उद्योगांनी नोव्हेंबर महिन्यात यंदाच्या चालू आर्थिक वर्षात सलग 9 व्या महिन्यात घट नोंदविली आहे.
देशातील प्रमुख आठ उद्योगांनी नोव्हेंबर महिन्यात यंदाच्या चालू आर्थिक वर्षात सलग 9 व्या महिन्यात घट नोंदविली आहे. वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मागील महिन्यात मुख्य उद्योगांच्या गणतीतील कोर सेक्टरचे उत्पादन 2.6 टक्क्यांनी घसरले आहे. प्रमुख उद्योग निर्देशांकांत कच्चे तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, स्टील आणि सिमेंट या पाच उद्योगांची प्रमुख घसरण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
येत्या वर्षात सोनं जाणार 60 हजाराच्या पार; सोन्याचा दर 63 हजारांवर जाण्याची...
मागील वर्षाच्या म्हणजे 2019 नोव्हेंबर मध्ये प्रमुख उद्योगांनी आपल्या उत्पादनात 0.7 टक्क्यांनी वाढ नोंदवली होती. त्यानंतर चालू आर्थिक वर्षाच्या सातव्या महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये सर्वात कमी 0.1 टक्के घट झाल्याचे समोर आले होते. आणि त्यानंतर आता सलग दुसऱ्या महिन्यात नोव्हेंबरमध्ये या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. तर ऑक्टोबर महिन्यात 0.9 टक्के घट नोंदली गेली होती. आणि कोळसा, खते आणि वीजनिर्मिती या तीन उद्योगांनी उत्पादनात वाढ नोंदविली आहे.
करदात्यांनो खुशखबर; ITR भरण्यासाठी मुदत वाढविली
कोळसा, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, खते, पोलाद, सिमेंट आणि वीज या आठ उद्योगांचा समावेश प्रमुख कोर उद्योगांमध्ये करण्यात येतो. यावर्षीच्या पहिल्या 8 महिन्यांमध्ये मागील वर्षांनुसार या आठ प्रमुख उद्योगांचे उत्पादन 11.4 टक्क्यांनी घसरले आहे. तर गेल्या वर्षी याच काळात यामध्ये 0.3 वाढ नोंदवली गेली होती.
चालू आर्थिक वर्षातील 9 वा महिना नोव्हेंबर - (आर्थिक वर्ष- मार्च 2020 ते फेब्रुवारी 2021)
कोळसा: + 2.9%
खते: + 1.6%
वीज: + 2.2%
कच्चे तेल: -4.9%
नैसर्गिक वायू: -9.3%
रिफायनरी उत्पादने: -4.8%
स्टील: -4.4%
सिमेंट: -7.1%