esakal | एकता आणि शोभा कपूर यांचे वेतन प्रस्ताव शेअर होल्डर्सनी धुडकावले
sakal

बोलून बातमी शोधा

ekta kapoor

एकता आणि शोभा कपूर यांचे वेतन प्रस्ताव शेअर होल्डर्सनी धुडकावले

sakal_logo
By
सुधीर काकडे

बालाजी टेलीफिल्म्स प्रोडक्शन हाऊसच्या भागीदारांनी संचालक शोभा कपूर आणि व्यवस्थापकीय संचालक एकता कपूर यांनी दिलेला वेतनाचा प्रस्ताव फेटाळला आहे. शोभा कपूर आणि मुलगी एकता कपूर यांनी १० नोव्हेंबरपासून पुढच्या दोन वर्षांसाठीच्या वेतन प्रस्तावाला पुरेशी मतं न मिळू शकल्याने हा प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही.

कंपनीच्या स्टॉक फाईलिंगमधून ही माहिती समोर आली आहे. बालाजी टेलिफिल्म्सच्या शेअर होल्डर्सने केलेल्या मतदानापैकी एकता कपूर यांच्या प्रस्तावाल ५५.४५ टक्के मतं मिळाली तर ५६.७६ टक्के मते मिळाली. हे विशेष ठराव पास करण्यासाठी ७५ टक्के मतांची आवश्यकता असते. विशेष म्हणजे बालाजी टेलीफिल्म्समध्ये ३४.३५ टक्के भागीदारी असलेल्या सर्वात मोठ्या प्रवर्तक गटाने या दोन्ही प्रस्तावावर मतदान केले नाही. या गटाने इतर ठरावांवर मत देणे पसंत केले. एकुण १०.११ कोटी मतांपैकी फक्त २०७,९२७ मते या दोन्ही ठरावांना मिळाली आहे.

दरम्यान, बालाजी टेलिफिल्म प्रोडक्शन हाऊसच्या ६५.६५ शेअर्स पैकी टक्के सार्वजनिक शेअर होल्डर्सपैकी, १८.४३ टक्के शेअर्स हे विदेशी पोर्टफोलिओ असणाऱ्या गुंतवणूकादारांकडे, १२ टक्के शेअर्स किरकोळ गुंतवणूकदारांकडे आणि २४.९२ टक्के शेअर्स हे रिलायन्स इंडस्ट्रीजकडे आहेत.

हेही वाचा: टेक्सल इंडस्ट्रीज Rights Issue च्या Equity Shares चे मूल्य

महत्वाची बाब म्हणजे प्रवर्तक शेअर होल्डरने एकता कपूर आणि शोभा कपूर यांच्या प्रस्तावाच्या बाजुने नाही. दरम्यान, प्रोडक्शन हाऊसला जुन 2021 मध्ये १.८३ चा नफा झाला असून जून २०२१ च्या १.४० करोड नफ्याच्या तुलनेत हा नफा तब्बल २३०.६३ टक्के जास्त आहे.

loading image
go to top