esakal | जाणून घ्या टेक्सल इंडस्ट्रीज Rights Issue च्या Equity Shares चे मूल्य
sakal

बोलून बातमी शोधा

टेक्सल इंडस्ट्रीज Rights Issue च्या Equity Shares चे मूल्य

17 ऑगस्ट 2021 रोजीच्या रेकॉर्ड डेट नुसार प्रत्येक 92 इक्विटी शेअरसाठी 55 राईटशेअर मिळतील. दोन सप्टेंबर रोजी या शेअरचा बंद भाव 70.25 रुपये होता.

टेक्सल इंडस्ट्रीज Rights Issue च्या Equity Shares चे मूल्य

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

मुंबई: वस्त्रोद्योगातील टेक्सल इंडस्ट्रीज लिमिटेडतर्फे राईट्स इश्यूची घोषणा करण्यात आली आहे. 14 सप्टेंबरदरम्यान हा इश्यू नोंदणीसाठी खुला असेल. यात 10 रुपये दर्शनी मूल्याचे प्रत्येकी 40 रुपये किंमतीचे 31,22,398 इक्विटी शेअर्स जारी केले जातील. 17 ऑगस्ट 2021 रोजीच्या रेकॉर्ड डेट नुसार प्रत्येक 92 इक्विटी शेअरसाठी 55 राईटशेअर मिळतील. दोन सप्टेंबर रोजी या शेअरचा बंद भाव 70.25 रुपये होता.

हेही वाचा: झेन टेकचे शेअर्स फक्त 4 दिवसात तब्बल 60 टक्क्यांनी वाढले

राईट्स इश्यू (हक्कभाग) मध्ये ज्या गुंतवणुकदारांकडे आधीच या कंपनीचे समभाग असतात, त्यांना कंपनी पुन्हा अग्रहक्काने सवलतीच्या दरात ते समभाग खरेदी करण्याची ऑफर देते. रेकॉर्ड डेट ला ज्या गुंतवणुकदारांकडे हे समभाग असतात, त्यांनाच हे हक्कभाग मिळू शकतात. ती ऑफर स्वीकारणे किंवा न स्वीकारणे हे त्या गुंतवणुकदारांच्या हातात असते. सहसा असे हक्कभाग वितरण हे त्या शेअरच्या बाजारभावापेक्षा कमी दरात केले जाते. त्यामुळे हे हक्कभाग घेणाऱ्या गुंतवणुकदारांचा फायदा होतो. कंपनीच्या विस्तारासाठी बँकेचे कर्ज न काढता किंवा एफपीओ (पुनश्च पब्लिक ऑफर) द्यायची नसेल त्या कंपन्या राईट्स इश्यू जारी करतात.

हेही वाचा: 'कोटक महिंद्रा' विकणार भारती एंटरप्रायजेसला 'एअरटेल'चे 20 कोटी शेअर्स

कंपनी आपल्या विस्तारासाठी 29.92 कोटी रुपये गुंतवणार असून यापूर्वी त्यांनी 14.73 कोटी रुपये अंतर्गत निधीतून तसेच कर्जाद्वारे जमवले आहेत. हा विस्तार पूर्ण झाल्यावर कंपनीची स्थापित क्षमता दुप्पट होऊन वार्षिक 19 हजार मेट्रिक टन उत्पादन होईल. या राईट्स इश्यूद्वारे 12.49 कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे, असे टेक्सल इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश मेहता म्हणाले.

loading image
go to top