भाजपच्या यशामुळे शेअर बाजारात उसळी

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 मार्च 2017

रुपयाला बळ
शेअर बाजारातील वाढीमुळे रुपयाला बळ मिळाले आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया आज सकाळच्या सत्रात 42 पैशांनी वधारला. रुपयाने देखील डॉलरच्या तुलनेत वर्षभरातील उच्चांकी पातळी गाठली आहे.

मुंबई - उत्तर प्रदेशातील निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी सरकारला घवघवीय यश मिळाल्याने याचा परिणाम शेअर बाजारावर झाल्याचा आज (मंगळवार) दिसून आले. आज सकाळी शेअर बाजार सुरू होताच अपेक्षेप्रमाणेच निफ्टी आणि सेन्सेक्स या दोन्ही मुख्य निर्देशांकांनी उसळी घेतली.

उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये भाजपला प्रचंड बहुमत मिळाले आहे. तसेच गोवा आणि मणिपूरमध्येही भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. या निकालाला शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी आनंदोत्सव साजरा केला आहे.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक उच्चांकी पातळी गाठत सुमारे 600 अंशांनी वधारला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 125 अंशांनी वधारला होता. सध्या सेन्सेक्स (11 वाजता) 486 अंशांनी वधारला असून 29,432.57 पातळीवर व्यवहार करतो आहे. तर निफ्टीमध्ये 146 अंशांची वाढ झाली असून सध्या 9,081.25 पातळीवर आहे

रुपयाला बळ
शेअर बाजारातील वाढीमुळे रुपयाला बळ मिळाले आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया आज सकाळच्या सत्रात 42 पैशांनी वधारला. रुपयाने देखील डॉलरच्या तुलनेत वर्षभरातील उच्चांकी पातळी गाठली आहे.

Web Title: up election results affect share market