एलन मस्क करापासून सुटकेसाठी बनले दानशूर; 45 हजार कोटींचे शेअर्स दान

Elon Musk
Elon Muskesakal
Summary

एलन मस्क यांनी दान केलेली ही रक्कम इतिहातील सर्वात मोठी रक्कम असल्याचे सांगितले जात आहे.

नवी दिल्ली - जगातील सर्वात मोठा श्रीमंत उद्योगपती एलन मस्क (Elon Musk) याने आपले ४५ हजार कोटींचे (५ बिलीयन डॉलर) शेअर्स दान केले आहेत. हे शेअर्स त्यांनी एका निनावी चॅरिटीला दिले आहेत. सिक्योरिटीज अँड एक्सचेंज कमिशनच्या अनुसार मस्क यांनी ५,०४४.००० हजार शेअर्स नोव्हेंबर महिन्यात दहा दिवसांत ट्रान्सफर केले होते. मागच्या काही दिवसांपासूून त्यांच्या संपत्तीवर कर लावण्याची मागणी होत होती. त्यापासून सुटका करून घेण्यासाठी त्यांनी हे दान दिल्याचे सांगितले जात आहे.

एलन मस्क यांनी दान केलेली ही रक्कम इतिहातील सर्वात मोठी रक्कम असल्याचे सांगितले जात आहे. नोव्हेंबर महिन्यात मस्क यांनी एक ट्विटर पोल घेतला होता. ज्यात त्यांनी आपल्या फॉलोअर्सना विचारले होते की, करविषयक आरोपांपासून सुटका करण्यासाठी मी शेअर्स दान करावेत का? त्यावर ३५ लाख मतदारांपैकी ५८ टक्के जणांनी हो असे उत्तर दिले होते; परंतु मस्क यांनी शेअर्स कुणाला दान दिले हे उघड केले नाही.

Elon Musk
Paytm देतंय कुठल्याही गॅरंटीशिवाय 5 लाखांचं कर्ज; वाचा प्रोसेस

मागील काही दिवसांपासूून राजकीय नेते आणि मस्क यांच्यात संघर्ष सुरू होता. याचा परिणाम म्हणून मस्क यांनी हे दान दिल्याचे ब्लुमबर्गच्या अहवालात म्हटले आहे. बर्नी सँडर्स आणि एलिजाबेथ वॉरेन या नेत्यांनी मस्कसारख्या अब्जाधीशांच्या शेअर्स आणि संपत्तीवर कर लावण्याचा प्रस्ताव ठेवला होता. विशेषतः मस्क यांच्या वैयक्तिक संपत्तीला या नेत्यांनी लक्ष्य केले होते. त्यामुळेच मस्क दानशूर झाल्याचे बोलले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com