ELSS Vs Gold Mutual Fund : 500 रुपयांमध्ये मिळेल तगडा परतावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ELSS Vs Gold Mutual Fund : 500 रुपयांमध्ये मिळेल तगडा परतावा

ELSS Vs Gold Mutual Fund : 500 रुपयांमध्ये मिळेल तगडा परतावा

ELSS Vs Gold Mutual Fund: गुंतवणूक करायचा विचार करताय पण चांगल्या परताव्याच्या स्कीम्स कोणत्या समजत नाही का ? चांगल्या परताव्यांसाठी तुम्ही इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ELSS) या गोल्ड म्यूचुअल फंड (Gold Mutual fund) मध्ये गुंतवणूक करु शकता. हे दोन पर्याय दीर्घ काळ गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय आहेत. या दोन्ही स्कीम्सबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

ELSS- गुंतवणुकीवर टॅक्स सुटीचाही फायदा

3 वर्षांचा लॉक-इन पीरियड

ELSS मध्ये 3 वर्षांचा लॉक-इन पीरियड (Lock in period) असतो, याचा अर्थ तुम्ही जे पैसे गुंतवले आहेत ते पुढच्या 3 वर्षांसाठी काढता येणार नाहीत. इतर स्कीम्सच्या तुलनेत याचा लॉक-इन पीरियड अतिशय कमी आहे.

500 रुपयांनी करा सुरुवात

ELSS मध्ये सिस्‍टमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅनच्या (SIP) माध्यमातून केवळ 500 रुपयांनी सुरुवात करता येऊ शकते. जास्तीत जास्त गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा नाही आहे. गुंतवणूक करणाऱ्यांना यात दोन पर्याय मिळतात. पहिला पर्याय आहे वाढीचा, तर दुसरा आहे डिव्हिडेंड पे आउट. वाढ (Growth) पर्यायामध्ये पैसे सतत योजनेत राहतात.

हेही वाचा: काबूल: भारताच्या प्रकल्पांबाबत तालिबानची महत्त्वाची भूमिका

कसा मिळेल फायदा ?

डिव्हिडेंड या पर्यायात कंपन्या वेळोवेळी फायदा देतात. डिव्हिडेंड पर्यायाच्या (Dividend option) योजनांमध्ये वर्षात एकदा डिव्हिडेंड मिळू शकतो. तर काही योजनांमध्ये एका वर्षात एकापेक्षा जास्त वेळा डिव्हिडेंड दिला जातो.

इन्कम टॅक्स 80C मध्ये टॅक्स सूट

एक आर्थिक वर्षात तुम्ही 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर इन्कम टॅक्स एक्ट सेक्शन 80C अंतर्गत टॅक्स सूटीचा फायदा घेऊ शकता. याशिवाय ELSS मधील गुंतवणुकीवर मिळणारा लाभ आणि गुंतवणुकीतील युनिट्स विकण्यातून (Redemption) होणारी कमाईही पुर्णतः टॅक्स फ्री असते.

1 लाख रुपयांपर्यत कोणताही टॅक्स नाही

म्युच्युअल फंडातून एका वर्षात मिळणाऱ्या 1 लाख रुपयांपर्यंत दीर्घ मुदतीचा भांडवली नफ्यावर (LTCG) कोणताही इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही. जर नफा या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर 10%दराने कर भरावा लागेल.

Web Title: Elss Vs Gold Mutual Fund Great Option For Long Term

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Gold RateMutual FundELSS