ईपीएफओ’ शेअर बाजारातील गुंतवणूक आणखी वाढवणार?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली: कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) शेअर बाजारात अधिक गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे, अशी माहिती केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी दिली.

सरलेल्या वर्षात ईपीएफओने ईटीएफमधील गुंतवणूक 5 टक्क्यांवरुन 10 टक्क्यांवर नेली होती. आता ही गुंतवणूक 15 टक्क्यांवर नेण्याचा विचार असल्याचे केंद्रीय कामगार मंत्र्यांनी सांगितले. केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या आगामी बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचेही असोचेमच्या कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सुमारे 4 कोटी सदस्य असलेल्या ईपीएफओचा डिसेंबर अखेर एकुण निधी रु.8.5 लाख कोटींवर पोचला आहे.

Web Title: epfo investment in share market to increase