निवृत्तिवेतनधारकांच्या ‘हयातीच्या दाखल्या’स आणखी मुदतवाढ

वृत्तसंस्था
बुधवार, 18 जानेवारी 2017

नवी दिल्ली: निवृत्तीवेतन संघटनेने(ईपीएफओ) सदस्यांना डिजिटल पद्धतीने हयातीचा दाखला देण्याच्या मुदतीत पुन्हा एकदा वाढ केली आहे. देशभरातील 50 लाखांपेक्षा अधिक निवृत्तिवेतनधारक 28 फेब्रुवारीपर्यंत हयातीचा दाखला ईपीएफओकडे सादर करू शकतात.

"डिजिटल पद्धतीने प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आधार क्रमांकाची आवश्यकता आहे. निवृत्तीवेतन सेवांचा लाभ सुरु ठेवण्यासाठी सदस्यांना आधार क्रमांक सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आता बँकांमधून हयातीचा दाखल घेण्याची पद्धत बंद झाली आहे. सदस्यांना मोबाईल फोनद्वारे किंवा सामाईक सेवा केंद्र अथवा ठराविक बँकांमध्ये हा दाखला सादर करता येईल", अशी माहिती संस्थेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

याआधी नोटाबंदीमुळे झालेली गैरसोय टाळण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात हयातीचा दाखला सादर करण्याची मुदत 15 जानेवारी, 2017 पर्यंत वाढविण्यात आली होती.

Web Title: EPFO pensioners can give digital life certificate till Feb 28